• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • तामिळनाडूतील `या` वृद्ध दाम्पत्याच्या भोजनालयात पराठा मिळतो केवळ 2 रुपयांना

तामिळनाडूतील `या` वृद्ध दाम्पत्याच्या भोजनालयात पराठा मिळतो केवळ 2 रुपयांना

महागाईचा काळ पाहता हातावरच्या पोटाला चटके बसत आहेत. आणि या अशा परिस्थितीlत तामिळनाडूतील एक असे दाम्पत्य आहे जे केवळ 2 रुपयांमध्ये भुकेल्यांची पोटं भरतात.

  • Share this:
नवी दिल्ली : महागाईचा काळ पाहता हातावरच्या पोटाला चटके बसत आहेत. आणि या अशा परिस्थित कुणाला सढळ हाताने मदत करणे म्हणजे मोठ्या जोखमीचे काम बनते. पण तामिळनाडूत एक असे दाम्पत्य आहे जे केवळ 2 रुपयांमध्ये भुकेल्यांची पोटं भरतात. काही दिवसापूर्वी, कोईम्बतूरमधील एम. कमलाथल अम्मा यांची गोष्ट व्हायरल झाली होती.

30 वर्षांपूर्वी दुकान सुरू केले

73 वर्षीय बाला कृष्णन आणि त्यांची 66 वर्षीय पत्नी लक्ष्मी यांचा प्रेरणदायी प्रवात आहे. दोघेही गेल्या 30 वर्षांपासून नागरकोइलच्या राजपथाईमध्ये भोजनालय चालवतात जिथे 2 रुपयेला पराठा विकतात. या जोडप्याच्या ढाब्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे मिळणारा 2 रुपयांचा परोटा आहे, ज्याची किंमत त्यांनी गेल्या 12 वर्षांपासून वाढवली नाही. ते म्हणतात की ते भविष्यात ते बदलणार नाही, कारण हे अनेक विद्यार्थी आणि गरीबांसाठी वरदान आहे. नागरकोइलमधील एरानिएल येथील बाला कृष्णनन आणि लक्ष्मी या दाम्पत्यानं आपल्या भोजनालयाचं नाव `अम्मा` असं ठेवलं आहे. नागरकोइलला जाणारा-येणाऱ्यांसाठी हे अगदी हक्काचं ठिकाण बनलं आहे. खरं तर, या भागातील अन्य हॉटेल्समध्ये पराठा 6 ते 10 रुपयांना मिळतो. मात्र अम्मा भोजनालयातील स्वस्त आणि स्वादिष्ट पराठा खाण्यासाठी दररोज लोकांची मोठी गर्दी होती.

लोकांची भूक शांत करण्याचा उद्देश

66 वर्षीय लक्ष्मी म्हणाली, 'आम्हाला प्रत्येकाची भूक शमवायची आहे. म्हणून आम्ही पराठा 2 रुपयांना विकण्याचा निर्णय घेतला आणि परिसरात राहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना ते परवडणारे बनवले.रवीवारी दुकान बंद असते. वाढत्या वयामुळे, हे जोडपे कधीकधी सोमवारी देखील बंद ठेवतात. हे जोडपे नागरकोईलमधील इरानिएलचे रहिवासी आहेत. दोघांनीही लहानपणी गरिबी पाहिली आहे. ``माझं बालपण खूप गरीबीत गेलं. वडिलांच्या निधनानंतर माझ्या आईवर 5 मुलांची जबाबदारी होती. मी लहान होतो, तेव्हा हॉटेलमध्ये विकला जाणारा पराठा लांबून पहायचो. तो खरेदी करण्यासाठी माझ्याकडे पैसे नसायचे. लहानपणीचे दिवस खूप कठीण होतं. कुटुंबाला हातभार लागावा यासाठी मी चेन्नईला गेलो आणि एका हॉटेलमध्ये नोकरी करू लागलो,`` असं बाला कृष्णनन यांनी सांगितलं. ``माझं बालपण गरीबीत गेल्यानं तो अनुभव लक्षात घेत मी पराठ्याची किंमत कमी ठेवली. एखादी गरीब व्यक्ती त्यामुळे पराठा खाऊ शकते. एखाद्याकडे पैसे नसतील तरी तो आमच्या भोजनालयातून उपाशी जात नाही. आम्ही हा व्यवसाय सुरू केला तेव्हा पराठ्याची किंमत 25 पैसे होती. त्यानंतर ती वाढवत 2 रुपये केली. मात्र यापेक्षा जास्त दरवाढ करायची नाही असा निर्णय आम्ही घेतला. मात्र ग्राहकांच्या मागणीनुसार पराठ्याचा आकार मात्र थोडा वाढवला. त्यामुळे 5 रुपयांना त्याची विक्री होते``, असं बाला कृष्णनन यांनी सांगितलं. ``गरजूंना अन्न (Food) मिळावं, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही 2 रुपयांत पराठा विक्रीचा निर्णय घेतला. परिसरातील विद्यार्थ्यांचाही विचार आम्ही केला. वयोमानामुळे आम्ही रविवारी भोजनालय बंद ठेवतो. कधीकधी सोमवारीही भोजनालय बंद ठेवावं लागतं. गेल्या काही वर्षापासून पराठ्याचे दर कायम असल्यानं आम्हाला तोटा झालेला नाही. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत व्यवसायावर परिणाम झाला. परंतु, आता व्यवसाय तेजीत सुरू आहे``, असं लक्ष्मी यांनी सांगितलं.
First published: