कोरोना झाला नसतानाही आजीने केली आत्महत्या, पोलीस तपासात समोर आली व्हायरसची दहशत

कोरोना झाला नसतानाही आजीने केली आत्महत्या, पोलीस तपासात समोर आली व्हायरसची दहशत

  • Share this:

कोल्हापूर, 28 मार्च : संपूर्ण देशामध्ये कोरोनाव्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. या रोगाला आवर घालण्यासाठी संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन केलं असताना नागरिकांमध्ये मात्र भलतीच भीती आहे. कोरोना झाला नसतानाही होईल या भीतीने आत्महत्या केल्याच्या बातम्या समोर आल्या. असाच एक धक्कादायक प्रकार कोल्हापूरमध्ये समोर आला आहे. एका वयोवृद्ध महिलेने कोरोनाव्हायरस होईल या भीतीने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कोरोना आजार हा वृद्धांना आणि लहान मुलांना लगेच होतो त्यामुळे घरात वृद्ध किंवा लहान मुलं असतील तर त्यांची काळजी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या. पण यावर लोक काळजी न घेता भीती बाळगत आहेत. मला कोरोना झाला तर घरातील लहान बाळालापण होईल या भीतीने आजीने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. या भीतीने आजीने टोकाचं पाऊल उचलत विहिरीमध्ये उडी घेत कायमचं आयुष्य संपवलं.

हे वाचा - कोरोनाचा धोका वाढला, मुंबईत आज आणखी नवे 5 रुग्ण, महाराष्ट्रातील आकडा 159 वर

मृत महिलेच्या मुलाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आईला वाटलं की तिला हा आजार ग्रासेल आणि तिच्यामुळे घरातील नातवंडांना याचा त्रास होईल. म्हणून तिने भीतीने आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळावरून वृद्ध महिलेचा मृतदेह बाहेर काढला आहे.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनाला नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, घरातील आईला अशा प्रकारे गमावल्यामुळे संपूर्ण कुटुंबियावर दुखाचा डोंगर कोसळला आहे तर परिसरात शोककळा पसरली आहे.

हे वाचा - 'चला कोरोना पसरवूया', Infosysमधील इंजिनिअरच्या धक्कादायक पोस्टने खळबळ

First published: March 28, 2020, 9:27 AM IST

ताज्या बातम्या