मुंबईत लवकरच धावणार 'ओला'ची बस !

मुंबईत लवकरच धावणार 'ओला'ची बस !

ओला मुंबई शहरात एसी शटल बसची सुरुवात करणार आहे.

  • Share this:

21 जून : ओलाची आता एसी बसही लवकरच रस्त्यावर धावताना दिसणार आहेत. ओला मुंबई शहरात एसी शटल बसची सुरुवात करणार आहे.

ही शटल सेवा पूर्णत: वातानुकूलित असेल. ओला अॅपवर या बसचं बुकिंग करता येणार असून अगदी कमी दरात म्हणजेच 4 रुपये प्रति किमी पैसे आकारले जाणार आहेत. याचं सुरुवातीचं भाडं 49 रुपये असणार आहे. मुंबईत पीक अॅपवर म्हणजे कामाच्या वेळात या बस चाकरमान्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचवतील.

सकाळी 7 ते 11 दरम्यान आणि संध्याकाळी 5 ते 8 च्या दरम्यान या बस धावतील. ही शटल सेवा मिरा-भाईंदर ते पवई, भाईंदर, भाईंदर-अंधेरी, भाईंदर ते बीकेसी मार्गावर सुरु केलं जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2017 09:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...