महिला प्रवाशासमोर ओला ड्रायव्हर पाहत होता पाॅर्न व्हिडिओ

महिला प्रवाशासमोर ओला ड्रायव्हर पाहत होता पाॅर्न व्हिडिओ

  • Share this:

बंगळुरू, 27 आॅगस्ट : बंगळुरूमध्ये एका महिला प्रवाशाने ड्रायव्हवर प्रवासादरम्यान पाॅर्न व्हिडिओ पाहण्याचा आरोप केलाय. या महिलेनं ड्रायव्हरविरोधात पोलिसात तक्रार दाखल केलीय. ड्रायव्हर गाडी चालवत असताना पाॅर्न व्हिडिओ पाहत होता. जेव्हा या महिलेनं गाडी थांबवण्यास सांगितले तेव्हा त्याने नकार दिला असा आरोप या महिलेनं केलाय.

ही घटना शनिवारी घडली. प्रवाशी महिला येलहंका येथून 6.30 वाजता कॅबमध्ये बसली. तिला जेपीनगर येथील आपल्या आॅफिसला जायचं होतं. प्रवासादरम्यान गाडी चालवत असताना ड्रायव्हरने तिच्या देखत पाॅर्न फिल्म पाहिली. हा प्रकार घडत असताना महिलेनं गाडी थांबवण्यासाठी ड्रायव्हरला सांगितलं पण तिने ऐकलं नाही. कसंबसं या महिलेनं अखेर कस्तुरबा रोडजवळ गाडी थांबवली आणि तडक बाहेर पडली. बाहेर पडल्यानंतर या महिलेनं आरडाओरडा केला तेव्हा ड्रायव्हरने पळ काढला. पोलीस या ड्रायव्हरचा शोध घेत आहे.

ओलाने या प्रकरणावर आपलं स्पष्टीकरण दिलंय. आम्ही या प्रकारामुळे हैराण आहोत. आमच्याकडून त्या ड्रायव्हरची हकालपट्टी केलीये. आम्ही आमच्या ग्राहकाच्या बाजूने असून पोलीस चौकशीत पूर्ण सहकार्य करू अशी ग्वाही ओलाने दिली.

कार नव्हे, उदयनराजेंनी डंपर घेऊन शहरात मारला फेरफटका

First Published: Aug 27, 2018 09:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading