महिलेने 'ओला कॅब'मध्येच बाळाला जन्म दिला !

महिलेने 'ओला कॅब'मध्येच बाळाला जन्म दिला !

पुण्यात एका महिलेने चक्क 'ओला कॅब' कारमधेच बाळाला जन्म दिल्याची आश्चर्यकारक घटना घडलीय. पुण्याच्या कोंढवा भागात राहणारी ही महिला तिच्या सासुसोबत तपासणीसाठी डॉक्टरांकडे जात होती. मात्र वाटेतच तिला प्रसुती वेदना सुरु झाल्या आणि हॉस्पीटलला पोहचण्याआधीच चालत्या गाडीत तिची प्रसुतीही झाली. सध्या बाळ आणि बाळंतीन दोन्हीही सुखरूप आहेत.

  • Share this:

पुणे. 5 ऑक्टोबर : पुण्यात एका महिलेने चक्क 'ओला कॅब' कारमधेच बाळाला जन्म दिल्याची आश्चर्यकारक घटना घडलीय. पुण्याच्या कोंढवा भागात राहणारी ही महिला तिच्या सासुसोबत तपासणीसाठी डॉक्टरांकडे जात होती. मात्र वाटेतच तिला प्रसुती वेदना सुरु झाल्या आणि हॉस्पीटलला पोहचण्याआधीच चालत्या गाडीत तिची प्रसुतीही झाली. सध्या बाळ आणि बाळंतीन दोन्हीही सुखरूप आहेत.

पुण्यातील कोंढवा भागात राहणार्या सिंग दांपत्याला त्यांच्या पहिल्या अपत्याची चाहुल लागली आणि त्यांनी मंगळवार पेठेतील पुणे महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयात तपासण्या सुरु केल्या. सोमवारीही किशोरी सिंग तिच्या सासुसमवेत कमला नेहरु हॉस्पीटलमधे जाण्यासाठी निघाल्या. त्यासाठी त्यांनी 'ओला अॅप'वरुन कारही बुक केली. मात्र गाडीत बसताच किशोरीला प्रसुती वेदना सुरु झाल्या आणि वाटेतच तिने बाळाला जन्म दिला. किशोरी आणि रमेश सिंग आज अतिशय आनंदाने आणि समाधानाने त्यांच्या तीन दिवसांच्या बाळाला घेऊन हॉस्पिटलबाहेर पडले. हॉस्पिटलमधून त्यांना घरी पोहचवण्यासाठी पुन्हा तोच ओला क्याबचा ड्रायव्हर आला होता जो तीन दिवसांपूर्वी त्यांच्यासाठी अक्षरश देवदूत ठरला.

ओला कॅबचे ड्रायव्हर यशवंत गलांडे यांचासाठी देखील हा खरंतर कसोटीचा क्षण होता. किशोरी प्रसुत झाल्या तरी हॉस्पीटल अजून पाच किलोमीटर लांब होतं. पुण्याच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत तात्काळ हॉस्पीटलला पोहचणं गरजेचं होतं. पण चालक यशवंत गलांडे यांनीही जबाबदारी लिलया पार पाडली. त्यामुळेच बाळ आणि बाळंतीन हे दोन्हीही सुखरूप आहेत.

खरंतर भारतासारख्या महाकाय देशात कधी विमानात तर कधी रेल्वेमधे तर कधी चालू वाहनांमधे मुलांचे जन्म होतच असतात. प्रवासादरम्यान काही घटकेचे सोबती असलेले प्रवासीही अगदी सहजपणे माणुसकीचं दर्शन घडवतात, 'ओला' कॅबचे चालक चंद्रकांत गलांडे यांनीही तेच केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2017 09:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading