News18 Lokmat

पेट्रोल टँकरने भरलेलं जहाज किनारपट्टीवरून गायब; 22 भारतीय बेपत्ता

गेल्या 48 तासांपासून हा ही जहाज समुद्रातून गायब झाली आहे. त्यामुळे या जहाजेचे अपहरण झालं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 4, 2018 01:18 PM IST

पेट्रोल टँकरने भरलेलं जहाज किनारपट्टीवरून गायब; 22 भारतीय बेपत्ता

04 फेब्रुवारी : पश्चिम आफ्रिकेच्या किनारपट्टीवर तेल टँकर असलेली जहाज गायब झाल्याची बातमी आहे. या टँकरवर 22 भारतीय खलाशी आहेत. गेल्या 48 तासांपासून हा ही जहाज समुद्रातून गायब झाली आहे. त्यामुळे या जहाजेचे अपहरण झालं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पनामावर नोंदणी झालेल्या या जहाजात 13,500 टन पेट्रोल आहे आणि त्यांची किंमत 8.1 दशलक्ष इतकी आहे.

या टँकर कंपनीच्या सांगण्यानुसार गुरुवारी रात्री 5:30 वाजल्यापासून या जहाजाशी संपर्क होतं नाही आहे. जानेवारी महिन्यातही एक अशीच घटना घडली होती. ज्यात एमटी बॅरेट नावाच्या जहाजाचं बेनिन किनाऱ्यावरुन अपहरण करण्यात आलं होतं. त्यातही अनेक भारतीय खलाशी होते. ज्यांना खंडणी दिल्यानंतर सोडून देण्यात आलं.

मरीन ट्रॅफिक रेकॉर्डनुसार 180 मीटर लांब असलेला हा तेलाचा टँकर शेवटचा कोटोनाउमध्ये दिसला होता. सर्वेक्षक आणि शिपिंगचे महानिदेशक बीआर शेखर यांच्या सांगण्यानुसार भारताने नायझेरिया आणि बेनिनकडून या जहाजाला शोधण्यासाठी मदत मागितली आहे. पण मागील दोन महिन्यांत दोन जहाजे बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे.

अँग्लो-इस्टर्न शिप मॅनेजमेंटनं जहाज तेल टँकर असलेली जहाज गायब झाल्याचं आणि जानेवरीतही असा प्रकार घडल्याचं ट्विटद्वारे कळवलं आहे. यात भारतीय खलाशांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचंही ते म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 4, 2018 01:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...