Home /News /news /

अरे विजेशिवाय चालतो हा फ्रिज; सहा कोटी घरांमध्ये वीज नाही पण फ्रिज आहे!

अरे विजेशिवाय चालतो हा फ्रिज; सहा कोटी घरांमध्ये वीज नाही पण फ्रिज आहे!

कोण म्हणतं फ्रीज सुरू व्हायला वीज लागते?

    आफ्रिकेतील सहारा वाळवंटाच्या भागामध्ये फ्रिजशिवाय अन्न ताजं ठेवणं शक्य होत नाही. या ठिकाणी विजेची समस्या आहे. पण या ठिकाणी जवळपास 6 कोटी नागरिक वीज नसतानाही फ्रिज वापरत आहेत. येथील युम्मा नावाची एक स्टार्टअप कंपनी ही सुविधा पुरवत असून येथील नागरिकांच्या उत्तम जीवनासाठी सौर ऊर्जेच्या माध्यमातून खाद्य सुरक्षित ठेवण्यासाठी विविध साधनं पुरवत आहेत. छोट्या व्यावसायिकांसाठी फ्रिज या कंपनीने लहान उदयोजकांना हे सोलर फ्रिज उपलब्ध करून दिले आहेत. युम्माची मालकी असलेल्या निदेक ग्लोबल अप्लायंसेसचे रिसर्च अँड डेव्हलपमेंट मॅनेजर एंड्रम मोर्रीसेन यांनी याविषयी सांगितले, अन्न वाया जाऊ नये तसंच दीर्घकाळ ताजं रहावं म्हणून आम्ही हे सोलर फ्रिज विकसित केले आहेत. 2019 मध्ये कंपनीने तयार केलेल्या 2000 फ्रीजपैकी 80 टक्के फ्रिज हे छोट्या व्यावसायिकांसाठी तयार केल्याचे त्यांनी सांगितले. Energy efficient आहेत सोलर फ्रिज 100 लिटरचे हे फ्रिज तयार करण्यात आले असून या फ्रिजची कुलिंग सिस्टीम ही ऑफ ग्रीड पॉवरसाठी डिझाईन करण्यात आली आहे. सामान्य फ्रिजच्या तुलनेत केवळ पाव भाग वीज या फ्रिजला लागते. महत्त्वाचे म्हणजे बॅटरी आणि ऊर्जेशिवाय हा फ्रिज दीड दिवस सुरु राहू शकतो. हे ही वाचा-फक्त बिस्किट चाखण्यासाठी मिळणार 40 लाख रुपये पगार ; कंपनीने ऑफर केला हटके जॉब असे द्यावे लागतात पैसे ज्या ग्राहकांनी फ्रिज खरेदी केले ते केनियाच्या M-Kopa या कंपनीकडे दररोज देखील याचा हफ्ता देऊ शकतात. सुरूवातीला 100 डॉलर भरावे लागतात. त्यानंतर दिवसाला 1 किंवा दीड डॉलर भरून हा फ्रिज घेऊ शकतात. यामध्ये ग्राहकांना सोलर पॅनल देखील मिळते. जर ग्राहकांनी याचे पैसे दिले नाहीत तर फ्रिज काम करत नाहीत. साधारणपणे या फ्रिजची पूर्ण रक्कम फेडण्यासाठी 2 वर्षं लागतात. या फ्रिजची किंमत साधारण फ्रिजपेक्षा जास्त आहे.पण इतर फ्रिजला लागणारी वीज याला लागत नसल्याने तुम्ही आयुष्यभर याचा सौर ऊर्जेच्या मदतीने लाभ घेऊ शकता. सध्या युम्मा केनिया आणि युगांडामध्ये फ्रिज विकत आहे. पण कंपनी लवकरच नायजेरिया, टांझानिया, झाम्बिया, सेनेगल आणि आयव्हरी कोस्टमध्ये आपला विस्तार करणार आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: State Electricity

    पुढील बातम्या