पोलिसांच्या काळजीसाठी धावले मुंबई आयुक्त, कोरोनापासून वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय

पोलिसांच्या काळजीसाठी धावले मुंबई आयुक्त, कोरोनापासून वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय

55 वयापेक्षा जास्त अधिकारी बंदोबस्ताला येणार नाहीत. गेल्या 3 दिवसात 3 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस खात्याकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 28 एप्रिल : कोरोना माहामारीवर मात करण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन असताना पोलीस खातं मात्र दिवस-रात्र काम करत आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ पोलीस कर्मचा-यांना घरी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खरंतर आतापर्यंत 3 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे हा निर्णय मुंबई पोलिसांकडून घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 55 वयापेक्षा जास्त अधिकारी बंदोबस्ताला येणार नाहीत. गेल्या 3 दिवसात 3 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस खात्याकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या 48 तासांत मुंबईत कोरोना विषाणूने 3 पोलिसांचा बळी घेतला. सोमवारी कुर्ला वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार शिवाजी नारायण सोनावणे (वय- 56) यांचं सोमवारी कोरोनाव्हायरसशी झुंज देत असताना निधन झालं. तर संरक्षण शाखेतील चंद्रकांत पेंदुरकर आणि वाकेला पोलीस स्टेशनचे संदीप सुर्वे यांचे रविवारी करोनामुळे निधन झालं होतं.

खूशखबर! भारत 'या' तारखेपर्यंत मिळवणार कोरोनावर विजय, संशोधकांचा सर्वात मोठा दावा

पुण्यात आणखी 5 पोलिसांना कोरोनाची लागण

पुण्यात जीवाची बाजी लावून कर्तृव्यावर असलेल्या पोलिसांना कोरोनाची लागण झाल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पुण्यात आज आणखी 5 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. पुणे पोलीस दलात आतापर्यंत 8 जण कोरोनाबाधित झाले आहे. या 8 ही पोलिसांच्या संपर्कात आलेले 100 हुन अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

Breaking: देश पुन्हा हादरला! मंदिर परिसरात हत्या 2 साधूंची गळा दाबून हत्या

पुण्यात पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची बाबसमोर आल्यानंतर पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ज्या महिला पोलीस कर्मचारी गर्भवती आहे, त्यांना कोणत्याही बंदोबस्तात ड्युटी देण्यात येणार नाही. तसंच, खबरदारी म्हणून ज्या पोलिसांना आधीपासून कोणते आजार किंवा व्याधी असतील अशा पोलिसांनी नाकाबंदीची ड्युटीवर पाठवले जाणार नाही.

दरम्यान, महाराष्ट्रात 27 एप्रिलपर्यंत तब्बल 107 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात 20 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 2 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 7 पोलिसांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.

'या' जिल्ह्यात एका झटक्यात वाढले 36 कोरोना रुग्ण, नागरिकांची चिंता वाढली

First published: April 28, 2020, 11:16 AM IST

ताज्या बातम्या