विजय माल्ल्याचं भारताकडे प्रत्यार्पण होणार; लंडन कोर्टाचा मोठा निर्णय

विजय माल्ल्याचं भारताकडे प्रत्यार्पण होणार; लंडन कोर्टाचा मोठा निर्णय

भारतातल्या बँकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये विलासी जीवन जगतअसलेल्या विजय माल्ल्याला भारताकडे प्रत्यार्पण करण्याचा मोठा निर्णय लंडन कोर्टानं घेतला आहे. 

  • Share this:

नवी दिल्ली, 10 डिसेंबर : भारतातल्या बँकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये विलासी जीवन जगतअसलेल्या विजय माल्ल्याला भारताकडे प्रत्यार्पण करण्याचा मोठा निर्णय लंडन कोर्टानं घेतला आहे.  विजय मल्ल्याला भारताकडे सोपवावं अशी विनंती केंद्र सरकारने ब्रिटनच्या न्यायालयात केली होती. त्यावर निकाल देत लंडनचं न्यायालयानं हा मोठा निर्णय घेतला आहे.

न्यायालयाच्या या अपेक्षीत निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाची एक खास टीम लंडनमध्ये दाखल झाली होती. सीबीआयचे संयुक्त संचालक ए. साई मनोहर यांच्या नेतृत्वाखाली हे पथक सर्व घटनांवर लक्ष ठेवून होतं. लंडनचं कोर्टाचा निकाल सकारात्मक आल्यामुळे आता मल्ल्याला भारतात घेऊन येण्याचं काम ही टीम करणार आहे.

भारतात पाठवण्याच्या निर्णय येण्याच्या चार दिवसांपूर्वीच देश सोडून पळून गेलेल्या विजय माल्ल्याने सगळं कर्ज फेडण्याची तयारी दाखवली होती. भारतीय बँक आणि सरकारला ट्विट करत माल्याने त्याचा प्रस्ताव मान्य करण्याची विनंती केली होती. तर, ज्या-ज्या बँकांकडून कर्ज घेतलं होतं ते सर्व कर्ज फेडाण्याची तयारी त्याने दर्शविली होती. मात्र, त्यावरचं व्याज मी देऊ शकत नाही असंही त्यानं म्हटलं होतं.

सक्त वसुली संचालयाने मल्ल्याला फरार आरोपी असं म्हटलं होतं. 'फरारी आरोपी' या शब्दामुळे माझ्या प्रतिमेला धक्का लागला आहे. त्यामुळं 'मला फरारी आरोपी' म्हाणू नका अशी याचिका मल्ल्याने सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. काही दिवसांपूर्वी विजय मल्ल्याने बँकांकडे नवा प्रस्ताव पाठवला होता. त्यात त्याने मुद्दलाचे पूर्ण पैसे देतो, व्याज नाही असं आश्वासन दिलं होतं. पण त्याचा हा प्रस्ताव बँकांनी धुडकावून लावला होता. सद्या लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या विजय माल्ल्याने भारतातील बँकांचं जवळपास 9 हजार कोटींचं कर्ज बुडवलं आहे. लंडनमधील वेस्टमिंस्टर कोर्टात गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रत्यार्पणासाठी सुनावणी सुरू होती. 

माल्याने ट्विट करत म्हटले होते की, ‘माझ्यावर टिपण्णी करणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, मला हे कळत नाहीये की, माझा प्रत्यर्पणाचा निर्णय आणि कर्ज देण्याचा प्रस्ताव या दोन गोष्टींचा संबंध दुबईत झालेल्या प्रत्यर्पण प्रकरणाशी कसा जोडला जात आहे. मी कुठेही राहत असलो तरी मी हेच सांगेन की माझे पैसे घ्या. मी बँकांचे पैसे घेऊन पळालो हे प्रकरण मला आता थांबवायचे आहे.’

मध्यंतरी विजय माल्ल्याने देश सोडण्यापूर्वी मी अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटलो होतो, असा खळबळजनक खुलासा केला होता. तसंच तडजोडीचा प्रस्ताव दिला होता पण त्यावर काही तोडगा निघाला नाही असा दावाही मल्ल्याने केला. मात्र, अरुण जेटली यांनी विजय मल्ल्याचा दावा खोडून काढला होता. विजय मल्ल्याचं वक्तव्य धादांत खोटं आणि बिनबुडाचं आहे, माझी अशी कोणतीही भेट झाली नव्हती असा दावा जेटलींनी केला होता.  कधीकाळी भारतातील यशस्वी व्यावसायिकांच्या यादीत माल्याचं नाव होतं. एक यशस्वी व्यावसायिक ते रसातळाला गेलेला आणि देश सोडून पळून गेलेल्या माल्याची कहाणी फार फिल्मी आहे. असे म्हटले जाते की, बॉलिवूडपासून ते कॉर्पोरेट लॉबीपर्यंत आणि खेळ जगतापर्यंत माल्याचं नाणंच चालायचं. त्याच्या एका चुकीने माल्याचं अख्ख आयुष्य बदलून गेलं.

२००७ मध्ये केली ही चूक- २००५ मध्ये माल्याने किंगफिशर एअरलाइन्सची सुरूवात केली. त्याला किंगफिशर एअरलाइन्सला एक मोठा ब्रँड बनवण्याचं स्वप्न होतं. यासाठीच त्याने २००७ मध्ये त्याने लो कॉस्ट एविएशन कंपनी डेक्कनला विकत घेतलं. यासाठी त्याने ३० कोटी डॉलर म्हणजे सुमारे १ हजार २०० कोटी रुपये खर्च केले. २००७ मध्ये १ डॉलरची किंमत साधारणपणे ४० रुपये होती. माल्याच्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चूक होती. या व्यवहारानंतर अवघ्या ५ वर्षात माल्याची किंगफिशर एअरलाइन्स बंद झाली आणि त्याचं संपूर्ण साम्राज्या पत्त्यांच्या किल्यासारखं कोसळलं.

विजय मल्ल्यासाठी सज्ज आहे आर्थर रोड तुरूंग

विजय मल्ल्याला भारतात आणल्यानंतर आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे अशी माहिती आहे. आर्थर रोड कारागृहाची नेमकी काय परिस्थिती आहे, कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची माहिती केंद्र सरकारने लंडन न्यायालयात दिली होती. विजय मल्ल्याने आर्थर रोड योग्य त्या सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर सीबीआयनं लंडन कोर्टात कारागृहाचा व्हिडीओ सादर केला. आठ मिनिटांच्या या व्हिडीओत विजय मल्ल्याचे दावे फेटाळून लावण्यात आले आहेत. मल्ल्याने कारागृहात उजेड किंवा पाणी नसल्याची तक्रार केली होती. यानंतर लंडनच्या वेस्टमिनिस्टर्स मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या जज एमा आर्बथनॉट यांनी भारताला व्हिडीओ सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार हा व्हिडीओ सादर करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये आर्थर रोड कारागृहातील बराक क्रमांक 12 मध्ये सूर्यप्रकाश येण्यासाठी मुबलक जागा असून तिथे आराम करण्याचीही व्यवस्था असल्याचं दाखवण्यात आलं आहे. यासोबतच बराकमध्ये खासगी शौचालय, टीव्ही आहे. मल्ल्याला रोज स्वच्छ चादरी आणि उशा दिल्या जातील.

माझे सारे पैसे घ्या पण मला चोर म्हणू नका- विजय माल्ल्या

First published: December 10, 2018, 5:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading