Elec-widget

#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'!

#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'!

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा वाढलेला असताना मुंबईनंतर आता जळगावचा पारा 37 अशंच्यावर गेलाय.

  • Share this:

मुंबई, 14 ऑक्टोबर : 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा वाढलेला असताना मुंबईनंतर आता जळगावचा पारा 37 अशंच्यावर गेलाय. पाच-सहा दिवसांपूर्वी मुंबईत 37 अंश तापमानाची नोंद झाली होती. त्यापाठोपाठ आता जळगावात 37.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर रविवारी नाशिक आणि परभणी येथे सर्वात कमी 16.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

मुंबईनंतर आता जळगावकरांना ऑक्टोबर हिट चा सामना करावा लागत आहे. राज्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद जळगावात झाली. रविवारी जळगावचं कमाल तापमान 37.6 अंश सेल्सिअस इतकं होतं. यापूर्वी 9 ऑक्टोबर रोजी मुंबईत 37.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईकरांना उन्हाचा चांगलाच तडाखा जाणवला. वाढतं तापमान आणि उष्ण वारे यांमुळे येत्या काळात आणखी तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, येत्या काही दिवसात नागरिकांना आणखीच घाम फुटणार आहे. 9 ऑक्टोबरला परभणीत 17.5 अंश तापमानाची नोंद झाली होती, त्यात एक अंशाने घट झाली. रविवारी परभणीत 16.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्याबरोबर नाशिकमध्येही 16.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. मुंबईत्या तापमानात तीन अंशांनी घट झाली असून, रविवारी संपलेल्या 24 तासात मुंबईत कमाल 34.7 तर किमान 27.4 अंश सेल्सिअस तापमान होतं.

गेल्या २४ तासांत राज्यातील इतर प्रमुख शहरांचं असं होतं तापमान (कमाल / किमान अंश सेल्सिअसमध्ये)

मुंबई : 34.7/ 27.4

मुंबई (कुलाबा) : 33.8/ 26.5

Loading...

सांताक्रुझ : 34.7 / 27.4

अलिबाग : 32.7 / 26.5

रत्नागिरी : 33.5 / 25.0

पणजी (गोवा) : 33.3 /26.5

डहाणू : 34.1 / 26.1

पुणे : 34.1 / 20.5

रायगड : 32.7 / 26.5

रत्नागिरी : 33.5 / 25.0

नाशिक : 34.1/ 16.4

कोल्हापूर : 33.8 / 22.3

महाबळेश्वर : 27.8/ 17.6

सांगली : 34.7 / 19.5

सातारा : 32.8 / 19.8

सोलापूर : 36.6 / 19.5

औरंगाबाद : 35.0 / 17.0

बीड : 36.0/

उस्मानाबाद : 34.3/

नांदेड : 36.0/

जळगाव : 37.6 /19.6

मालेगाव : 36.0 / 20.6

नागपूर : 33.5 / 21.1

ब्रह्मपुरी : 34.2 / 21.9

चंद्रपूर : 34.2 / 23.0

गोंदिया : 32.0 / 21.2

वर्धा : 35.0 / 20.0

अमरावती : 36.0 / 20.0

अकोला : 36.8 / 19.2

यवतमाळ : 36.0 / 17.8

बुलडाणा : 34.0 / 20.0

वाशिम : 35.2 / 23.0

 VIDEO एक खेळाडू जो पाच जणांचं क्रिकेट करिअर संपवू शकतो !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2018 05:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...