लॉकडाऊनमध्ये बंद असणाऱ्या खासगी दवाखान्यांना सरकारनं दिला कठोर इशारा

कोरोना विषाणूव्यतिरिक्त अन्य आजारांवरील उपचारांसाठी सरकारनं खासगी नर्सिंग होम आणि दवाखाने सुरु ठेवण्याचे आदेश दिले होते.

कोरोना विषाणूव्यतिरिक्त अन्य आजारांवरील उपचारांसाठी सरकारनं खासगी नर्सिंग होम आणि दवाखाने सुरु ठेवण्याचे आदेश दिले होते.

  • Share this:
    मुंबई, 25 एप्रिल: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडॉऊन सुरु आहे. मुंबईसह उपनगरात लॉकडाऊनच्या काळात जे नर्सिंग होम आणि खासगी दवाखाने बंद आहेत, अशा दवाखान्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. तसेच बंद असणाऱ्या खासगी दवाखान्यांवर 'एपिडेमिक ॲक्ट 1897' (साथरोग कायदा 1897) नुसार कारवाई करण्याचे निर्देशही महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्य खात्याला दिले आहेत. हेही वाचा.. 6 महिन्यांच्या चिमुरड्याला डिस्चार्ज, आईचा आनंद पाहून तुमचे डोळे पाणावतील! दरम्यान, कोरोना विषाणूव्यतिरिक्त अन्य आजारांवरील उपचारांसाठी सरकारनं खासगी नर्सिंग होम आणि दवाखाने सुरु ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, मुंबईत अनेक भागात अद्याप खासगी दवाखाने आणि नर्सिंग होम बंद आहेत. परिणामी इतर रुग्णांना मोठी गैरसोय होत आहे. आता असे खासगी दवाखाने आणि नर्सिंग होमवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दवाखान्यांचे थेट परवानेच रद्द करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. महापालिकेच्या सर्व 24 विभागातील सार्वजनिक आरोग्य खात्याचे वैद्यकीय अधिकारी आपापल्या कार्यक्षेत्राचे सर्वेक्षण करतील. या सर्वेक्षणादरम्यान जे नर्सिंग होम बंद असल्याचे आढळून येतील, त्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्याचप्रमाणे जे खासगी दवाखाने बंद आढळून येतील, त्यांच्याबाबत माहिती घेऊन संबंधित डॉक्टर किंवा दवाखाना उघडण्यात अडथळा आणणाऱ्यांवर 'एपिडेमिक ॲक्ट 1897' नुसार कारवाई करण्यात येणार आहे. हेही वाचा.. मुंबईत धोका कायम! प्रतिबंधित क्षेत्रांतही मोठी वाढ, 1000 चा आकडा पार अत्यावश्यक सेवेत अडथळा आणल्यास... अत्यावश्यक सेवेत अडथळा आणल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचे तसेच गुन्हे दाखल करण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत. नर्सिंग होम किंवा दवाखाने सोसायटी परिसरात, चाळीत किंवा भाड्याच्या जागेत असतील आणि ते उघडण्यास कोणी अडथळा आणत असेल तर त्यांच्यावर 'एपिडेमिक ॲक्ट 1897' नुसार आता कारवाई करण्यात येणार आहे. संकलन, संपादन- संदीप पारोळेकर
    First published: