मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Numerology: नक्की कसा असेल आजचा तुमचा दिवस? अंकशास्त्रानुसार काय आहेत संकेत? इथे मिळेल माहिती

Numerology: नक्की कसा असेल आजचा तुमचा दिवस? अंकशास्त्रानुसार काय आहेत संकेत? इथे मिळेल माहिती

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 7 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 7 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 7 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 7 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

बिझनेसशी संबंधित निर्णय रखडतील किंवा काही ठिकाणी तडजोड करावी लागेल. भागीदारी करण्यापूर्वी दोन वेळा विचार करा. प्रॉपर्टीशी संबंधित वाद सोडवण्यासाठी मदत करणारी एखादी व्यक्ती भेटेल. शिक्षक, नाट्य कलाकार, सोनार, वकील, डिफेन्स ऑफिसर, प्रशिक्षक आणि आयटी कर्मचारी यांना नवीन ऑफर मिळू शकते. आज आळशीपणा आणि तक्रारी टाळा. सूर्यदेवाला जल अर्पण करायला विसरू नका आणि सकाळी आदित्य हृदय स्तोत्राचा जप करा.

शुभ रंग : Yellow

शुभ दिवस : रविवार

शुभ अंक : 1 आणि 3

दान : कृपया गरिबांना केळी दान करा.

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

कामाच्या ठिकाणी प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी मोठ्या जबाबदाऱ्या खांद्यावर घ्या. रोमँटिक भावनांना आवर घाला. मनामध्ये गुंतागुंत आणि संशय असू शकतो. बिझनेस कमिटमेंट्स आरामात पूर्ण होतील. लहान ब्रँड्ससोबत पार्टनरशिप करण्यासाठी योग्य वेळ आहे. लोकांवर आंधळेपणाने विश्वास ठेवणं सोडा. भविष्यात दुखावले जाऊ शकता. राजकीय क्षेत्रातल्या व्यक्तींनी कागदपत्रांवर सही करताना किंवा आश्वासनं देताना काळजी घ्यावी. लिक्विड ट्रेडिंगमधल्या व्यक्तींना मोठा फायदा होईल. भगवान शंकराची पूजा करणं श्रेयस्कर ठरेल.

शुभ रंग : Peach

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 2 आणि 6

दान : कृपया गरिबांना दहीभात दान करा.

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

दिवसाची सुरुवात घरातल्या वडिलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घेऊन करा. एखादं नवीन नातं चालून येईल; मात्र सध्याची परिस्थिती पाहता ते टाळणं उत्तम. मित्रांसोबत खासगी गोष्टी शेअर करू नका. दिवस भाग्याचा राहील. कॉस्मेटिक्स व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक, फार्मासिस्ट, डॉक्टर, संगीतकार, डिझायनर, विद्यार्थी, न्यूज अँकर्स, अभिनेते, कलाकार, गृहिणी आणि लेखकांना करिअरशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळेल.

शुभ रंग : Orange

शुभ दिवस : गुरुवार

शुभ अंक : 3 आणि 1

दान : कृपया मंदिरामध्ये चंदन दान करा.

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमच्या विरुद्ध कट रचला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजूबाजूच्या वातावरणाकडे लक्ष द्या. प्रवास आणि भेटीगाठी करण्यासाठी उत्तम दिवस. आज सगळ्या असाइनमेंट्स पूर्ण होतील. कपडे आणि चपला दान केल्याने समाधान मिळेल. मशिनरी, मेटल, सॉफ्टवेअर व्यावसायिक आणि ब्रोकर यांनी आज अ‍ॅग्रीमेंट करणं टाळा. हीलिंग आणि सुशोभिकरणासाठी चांगला दिवस. पालकांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल.

शुभ रंग : Blue

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9

दान : कृपया गरजूंना ब्लँकेट्स किंवा चपला दान करा.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

नातेसंबंधांमध्ये एकमेकांप्रति विश्वास आणि आदर ठेवा. यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो हे लक्षात घ्या. यश मिळवण्यासाठी मेहनत करावी लागेल. तुमचं नशीब नेहमीच तुमच्या बाजूने असेल. आज तुमच्या कामासाठी कौतुक आणि बक्षीस मिळेल. प्रॉपर्टी किंवा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस. खेळाडू आणि ट्रॅव्हलर्सना आज भरपूर फायदा होईल. परीक्षेमध्ये भाग्य उजळवण्यासाठी हिरवे किंवा पिवळे कपडे घाला. आज गणपती मंदिरात जाऊन आशीर्वाद घेणं योग्य ठरेल.

शुभ रंग : Sea Green

शुभ दिवस : बुधवार

शुभ अंक : 5

दान : कृपया वृद्धाश्रमांमध्ये रोपं दान करा.

# नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

खेळाडूंना आज त्यांचं स्वप्न सत्यात उतरवता येईल. विरुद्धलिंगी व्यक्ती आणि वडिलधाऱ्यांचा सल्ला फायद्याचा ठरेल. तुमच्यावर लोक अवलंबून राहू शकतात. कमिटमेंट पूर्ण करणे हा तुमचा स्वभाव आहे; मात्र आज या स्वभावाचा गैरफायदा कुणाला घेऊ देऊ नका. मनात रोमँटिक भावना असेल; मात्र फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांवर विश्वास ठेवू नका. हॉटेल व्यावसायिक, ट्रॅव्हलर, ज्वेलर्स, अभिनेते, जॉकी आणि डॉक्टर्सना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. दिवस भाग्याचा राहील. खेळामध्ये प्रशिक्षकांचं मार्गदर्शन मोलाचं ठरेल.

शुभ रंग : Blue

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : कृपया चांदीचं नाणं दान करा.

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

इतरांच्या चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांना माफ करण्याचा आजचा दिवस आहे. तुमचे नेतृत्ववगुण आणि विश्लेषण कौशल्य ही तुमची जमेची बाजू आहे. बिझनेसमध्ये मोठे निर्णय घेणं टाळा. नातेसंबंधांमध्ये दुखावले जाऊ शकता. कायदेशीर वादापासून दूर राहा. अन्यथा बदनामी होऊ शकते. कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी नीट वाचा. कोर्ट, थिएटर, टेक्नॉलॉजी, सरकारी टेंडर, रिअल इस्टेट, शाळा, इंटेरिअर, धान्य या क्षेत्रांमधल्या व्यक्तींसाठी उत्तम दिवस. पार्टनरशिपमध्ये नसाल तर बिझनेस रिलेशन्स चांगली राहतील.

शुभ रंग : Orange and blue

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 7

दान : कृपया गरिबांना पिवळा भात दान करा.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमचा ब्रँड तयार करून मोठा फायदा मिळवण्याची संधी आज मिळेल. खर्च आणि गुंतवणूक यांची काळजी घ्या. दुपारनंतर केलेले बिझनेस व्यवहार फायद्याचे ठरतील. सर्जरी, कौन्सिलिंग, फॅमिली फंक्शन, प्रेझेंटेशन, सरकारी अ‍ॅग्रीमेंट किंवा मुलाखती टाळू नका. आज कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करणं गरजेचं आहे. कृपया प्रवास किंवा वाहन चालवणं टाळा. मेडिटेशन पॉवर वाढवण्यासाठी आणि सोशल स्टेटस उंचावण्यासाठी उत्तम दिवस.

शुभ रंग : Sea Blue

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : कृपया गरिबांना कच्ची केळी दान करा.

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

वाणी मृदू असेल आणि व्यक्तिमत्त्व उदार असेल, तेव्हाच नशीब तुमच्या बाजूने होतं हे लक्षात घ्या. मीडिया, क्रीडा, बांधकाम, मेडिकल, राजकारण आणि ग्लॅमर या क्षेत्रांमधल्या व्यक्तींना भरपूर प्रसिद्धी मिळेल. अभिनय, दिग्दर्शन, समुपदेशन, शिक्षण किंवा कला क्षेत्रातल्या व्यक्तींना आर्थिक फायद्याचा दिवस. बिझनेस किंवा कामाच्या ठिकाणी प्रगतीसाठी सरकारी ओळखींचा वापर कराल. दिवसाची सुरुवात करताना पाकिटात लाल हातरुमाल ठेवणं गरजेचं आहे.

शुभ रंग : Red

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 6 आणि 9

दान : कृपया आश्रमांमध्ये संत्री दान करा.

7 जुलै रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : एम. एस. धोनी, कैलाश खेर, अकबर खान, राकेश ओमप्रकाश मेहरा, गुरू हरकिशन

First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology