मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Numerology: जन्मतारखेनुसार आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या

Numerology: जन्मतारखेनुसार आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 15 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 15 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 15 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 15 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज सूर्यदेवाचे आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा. दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टी वा सल्ले ऐकण्याचा प्रयत्न करा, भविष्यात फायदा होईल. सध्या येणाऱ्या नवीन ऑफर स्वीकारू नका. कायदेशीर प्रकरणामध्ये मदत होणाऱ्या एखाद्या व्यक्तीची भेट होईल. अभिनेत्यांना आर्थिक फायदा होईल. कृपया चामड्याच्या वस्तू वापरणं टाळा.

शुभ रंग : Creame

शुभ दिवस : रविवार

शुभ अंक : 9

दान : कृपया गायींना किंवा गरिबांना केळी दान करा.

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमचा स्वभाव पहिल्यापासूनच दयाळू आहे. त्यामुळे तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी भरपूर आहे. ऑफिसमध्ये प्रगती होण्यासाठी आज खांद्यावर नवीन जबाबदारी घ्याल. दिवस रोमँटिक राहील, तुमच्या भावना सत्यात उतरवण्याची संधी मिळेल. बिझनेस कमिटमेंट्स आरामात पार पडतील. एखाद्या मोठ्या कंपनीसोबत पार्टनरशिप करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. राजकीय व्यक्तींनी कागदपत्रांवर सही करताना खबरदारी घ्यावी.

शुभ रंग : Sky Blue

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 2 आणि 6

दान : कृपया मंदिरात नारळ दान करा.

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

दिवसाची सुरुवात तुमच्या गुरूसाठी दिवा लावून करा. कोणत्याही क्षेत्रातल्या कलाकार व्यक्तींसाठी आज भाग्याचा दिवस. एखादं नवं नातं जोडलं जाण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगतीसाठी नशीब तुमच्या बाजूने असेल. डान्सर, मोटिव्हेशन स्पीकर्स, शिक्षक, समुपदेशक, संगीतकार, डिझायनर, विद्यार्थी, न्यूज अँकर, राजकारी, कलाकार, अभिनेते, गृहिणी, हॉटेल व्यावसायिक आणि लेखकांना आपल्या करिअरसंबंधी एखादी चांगली बातमी मिळेल.

शुभ रंग : Red

शुभ दिवस : गुरुवार

शुभ अंक : 3 आणि 1

दान : कृपया आश्रमात पिवळी मोहरी दान करा.

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

नवीन संधी शोधण्यासाठी आणि विवाहासाठी योग्य जोडीदार निवडण्यासाठी सध्या उत्तम काळ आहे. आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. सर्व कामं वेळेवर पूर्ण होतील. अन्नदान केल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. बांधकाम, मशिनरी, मेटल, सॉफ्टवेअर या क्षेत्रांतल्या व्यक्तींनी आणि ब्रोकर्सनी आज करारावर सही करणं टाळावं. पालकांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल.

शुभ रंग : Blue

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9

दान : कृपया घरातल्या कामगारांना झाडू दान करा.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

नवीन काम मिळणं, नवीन घरात राहायला जाणं, कुटुंबात एखादी नवीन व्यक्ती येणं किंवा नवीन मित्र जोडले जाणं या सर्व गोष्टींसाठी अनुरूप असा काळ सुरू आहे. आज दुपारनंतर नशीब तुम्हाला साथ देईल. तुमच्या कामाबद्दल प्रशंसा आणि बक्षीस मिळवण्याचा आजचा दिवस आहे. प्रॉपर्टी किंवा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास फायदा होईल. मीटिंगमध्ये हिरव्या रंगाचे कपडे घातल्यास नशीब चमकेल. तुमच्या जोडीदाराला प्रपोज करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे, मनासारखा प्रतिसाद मिळेल. खेळाडू आणि ट्रॅव्हलर्स व्यक्तींसाठी भाग्याचा दिवस.

शुभ रंग : Sea Green

शुभ दिवस : बुधवार

शुभ अंक : 5

दान : कृपया गरिबांना किंवा गायींना दूध दान करा.

# नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज समोर येणारी छोटी-मोठी कोणतीही संधी सोडू नका. तुमचा प्रामाणिकपणा तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष पैलू आहे. त्याचा कोणालाही गैरफायदा घेऊ देऊ नका. आज तुमच्या मनात रोमान्स आणि प्रॉमिसेस करण्याचे विचार असतील; मात्र फसवणुकीपासून सावध राहा. तुम्ही एकाच वेळी सर्वांना खुश करू शकत नाही हे लक्षात घ्या आणि खांद्यावर भरपूर जबाबदाऱ्या घेणं टाळा. हॉटेल व्यावसायिक, ट्रॅव्हलर, ज्वेलर्स, अभिनेते, जॉकी आणि डॉक्टर्सना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. खेळाडूंनी आपल्या प्रशिक्षकांचं मार्गदर्शन घ्यावं. ते भविष्यात उपयोगी ठरेल.

शुभ रंग : Blue

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6 आणि 2

दान : कृपया मंदिरात चांदीचं नाणं दान करा.

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

तुमचं नेतृत्व आणि विश्लेषण कौशल्य हे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे पैलू आहेत. टेक्नॉलॉजी क्षेत्रातल्या व्यक्तींनी आपली कौशल्यं वाढवण्यावर भर द्यायला हवा. नजीकच्या भविष्यात त्याचा करिअरमधल्या प्रगतीसाठी भरपूर फायदा होईल. आर्थिक गुंतवणूक करताना भूतकाळापासून धडे घेणं गरजेचं आहे. तुमच्या प्रामाणिकपणाच्या बदल्यात जोडीदाराकडून भरपूर प्रेम आणि आदर मिळेल. आज कागदपत्रांवर सही करताना खबरदारी बाळगा. कोर्ट, थिएटर, टेक्नॉलॉजी, सरकारी टेंडर, रिअल इस्टेट, शाळा, इंटेरिअर, धान्य व्यापार या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी चांगला दिवस. पार्टनरशिपमध्ये नसाल तर बिझनेस रिलेशन्स चांगली राहतील.

शुभ रंग : Yellow

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 7

दान : कृपया गायींना किंवा गरिबांना केळी दान करा.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज गायींसाठी दानधर्म केल्याने समाधान मिळेल. बिझनेस व्यवहार सुरळीत पार पडतील. कौटुंबिक कार्यक्रम, लग्न समारंभ, पार्टी, क्रीडा स्पर्धा, प्रेझेंटेशन, सरकारी कंत्राट किंवा मुलाखती या गोष्टींना आवर्जून उपस्थित राहा. आज मित्रपरिवारासोबत काही काळ व्यतीत करणं गरजेचं आहे. मेडिटेशन केल्यास फायदा होईल, प्रेमसंबंध बळकट होतील.

शुभ रंग : Sea Blue

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : कृपया आश्रमांमध्ये पुस्तके दान करा.

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज मंगळ ग्रहाची ऊर्जा मिळवण्यासाठी मनगटावर लाल रंगाचा धागा बांधा. मीडिया, क्रीडा, बांधकाम, मेडिकल, राजकारण आणि ग्लॅमर या क्षेत्रांतल्या व्यक्तींना भरपूर यश-प्रसिद्धी मिळेल. शिक्षण किंवा क्रिएटिव्ह आर्ट क्षेत्रांतल्या व्यक्तींना आर्थिक फायदा संभवतो. बिझनेसमध्ये किंवा कामात प्रगती होण्यासाठी ओळखींचा फायदा करून घेण्याचा विचार करत असाल, तर आज त्यासाठी उत्तम दिवस आहे. आज लाल कपडे घातल्याने फायदा होईल.

शुभ रंग : Red

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9 आणि 6

दान : कृपया महिलांना पुस्तकं दान करा.

15 जुलै रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : जय सिंह, के. कामराज, शैलेश लोढा, सरदार सिंग, परमेश्वर गोदरेज

First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology