Home /News /news /

Dead Sea जवळ 200 जण असे नग्न का उभे आहेत? न्यूड फोटो शूटला सरकारनेच दिला पाठिंबा

Dead Sea जवळ 200 जण असे नग्न का उभे आहेत? न्यूड फोटो शूटला सरकारनेच दिला पाठिंबा

Dead Sea जवळ 200 स्त्री-पुरुषांना घेऊन एका आर्टिस्टने (Spencer Tunick) न्यूड फोटो शूट केलं आणि त्याला चक्क तिथल्या सरकारने पाठिंबा दिला. काय आहे यामागचं कारण आणि उद्देश?

जेरुसलेम, 23 ऑक्टोबर:  इंटरनेटवर सध्या एक फोटो चांगलाच व्हायरल होतो आहे. या फोटोमध्ये (Dead sea viral images) समुद्रकिनाऱ्यावर कित्येक जण नग्नावस्थेत उभे असल्याचं दिसून येत आहे. हा फोटो इस्रायलमधला (Israel nude photo shoot at dead sea) आहे. या ठिकाणी अमेरिकी छायाचित्रकार स्पेन्सर ट्युनिक (Spencer Tunick) यांनी सुमारे 200-300 नागरिकांना नग्नावस्थेत पोझ (300 people stripped at Dead sea nude pose) देण्यासाठी सांगून, फोटोशूट केलं आहे. विशेष म्हणजे मृत समुद्राच्या किनारी हे आगळंवेगळं फोटोशूट पार पडल्यामुळे, हा समुद्रही पुन्हा चर्चेत आला आहे. या समुद्राकडे जगाचं लक्ष वेधण्यासाठीच हे फोटोशूट करण्यात आल्याचं इस्रायल सरकारने (Israel Govt) स्पष्ट केलं आहे. मृत समुद्र संपत चाललाय गेल्या काही वर्षांमध्ये या मृत समुद्राचा आकार लहान होत चालला आहे. तिथल्या खनिजांचं उत्खनन, आणि जागतिक तापमानवाढीमुळे वेगाने होत असलेलं बाष्पीभवन यामुळे या समुद्राला धोका निर्माण झाला आहे. यासोबतच, इस्रायल आणि जॉर्डन या देशांमधले नागरिक शेतीसाठी या समुद्राचं बरंच पाणी वापरत आहेत. त्यामुळेदेखील या समुद्राचा आकार कमी (Dead sea going extinct) होत चालला आहे. त्यामुळे इस्रायलच्या पर्यटन मंत्रालयाने जगाचं या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्याच्या उद्देशाने हे फोटोशूट आयोजित केलं होतं. केवळ मृत समुद्राच्या संवर्धनासाठीच नाही, तर देशाचा पर्यटन व्यवसाय वाढवण्याचाही (Israel tourism) त्यांचा हेतू होता. अर्थात, सरकारमधल्या सर्वांनाच ही कल्पना तेवढी रुचली होती असं नाही; मात्र तरीही हे फोटोशूट पार पडलं. संपूर्ण नग्न होत शरीरावर चढवला पांढरा रंग ठरल्याप्रमाणे रविवारच्या दिवशी या फोटोशूटमध्ये स्वेच्छेने सहभागी झालेल्यांना मृत समुद्राच्या किनारी नेण्यात आलं. याठिकाणी त्यांनी सर्व कपडे काढल्यानंतर, त्यांच्या शरीरावर पांढऱ्या रंगाचा थर देण्यात आला. यानंतर कडक उन्हामध्ये सुमारे तीन तास हे फोटोशूट (Dead sea nude photoshoot) चाललं. हा एक वेगळाच अनुभव असल्याचं सहभागी नागरिकांनी म्हटलं आहे. 'हे अगदीच नैसर्गिक वाटत होतं. एकदा कपडे काढल्यानंतर पुन्हा ते वापरावेसेच वाटत नव्हते,' असं मत एका महिला सदस्याने व्यक्त केलं. न्यूयॉर्क पोस्टने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. Nude फोटोग्राफीचं विशेष मोठ्या समुदायाचे न्यूड फोटो घेण्यासाठी ट्युनिक (Famous for large-scale Nude shoot) जगप्रसिद्ध आहेत. 1995 मध्ये त्यांना एका न्यूड फोटोसाठी अटकही करण्यात आली होती. एका आठ फूट उंच ख्रिसमस बॉलवर त्यांनी एका पुरूष मॉडेलला नग्नावस्थेत उभं केलं होतं. याबाबत बोलताना ते मिश्किलपणे म्हणाले होते, की 'या ख्रिसमस बॉलवर उभं राहू नका किंवा नग्नावस्थेत यावर उभं राहू नका असं तिथे कुठेच लिहिलं नव्हतं.' पुढे टाइम्स स्क्वेअर न्यूड फोटोशूट (Times Square Nude Photoshoot) आयोजित केल्याबद्दल त्याच वर्षी त्यांना अटक झाली. या वेळी त्यांनी न्यूयॉर्क शहरावरच खटला दाखल केला होता. 2005 मध्ये त्यांनी सिडनीमध्ये असंच न्यूड फोटोशूट केलं होतं. त्यात ऑस्ट्रेलियातल्या 5,200 एलजीबीटीक्यू (LGBTQ nude photoshoot in Sydney) नागरिकांनी सहभाग घेतला होता. मृत समुद्राजवळ नुकत्याच झालेल्या फोटोशूटबाबत बोलताना, 'इस्रायलमधलं फोटोशूट हा एक विलक्षण अनुभव होता. मध्य पूर्व आशियातला हा एकमेव देश आहे, जिथे अशा प्रकारच्या कलेला परवानगी देण्यात आलेली पाहायला मिळाली. मला इथे पुन्हा यायला आवडेल,' अशा शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
First published:

Tags: Bold photoshoot, Environment, Israel

पुढील बातम्या