S M L

अजित डोवल यांचा मुलगा राजकारणाच्या वाटेवर ?

Sachin Salve | Updated On: Jun 19, 2018 10:03 PM IST

अजित डोवल यांचा मुलगा राजकारणाच्या वाटेवर ?

उत्तराखंड, 19 जून : सध्या पौडी गढवाल मतदारसंघातून पूर्व केंद्रीय मंत्री बीसी खंडुरी निवडून आलेले आहेत. त्यांच वय पक्ष नेतृत्वाकडून निर्धारित केलेल्या वयापेक्षा अधिक असल्याने त्यांना आगामी लोकसभेचं तिकिट मिळणार नाही अशी चर्चा आहे. मागे झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी ऋतू खंडुरीने आपल्या वडिलांच्या संसदीय क्षेत्रातील विधानसभेच्या जागेवर विजय मिळवला होता.

अजित डोवल यांचे पुत्र शौर्य डोवल आणि इंडिया फाॅऊंडेशनच्या नावाने एक थिंक टँक चालवणारे शौर्य डोवलने 'बुलंद उत्तराखंड'च्या बॅनरखाली देहरादूनमधे 'बेमिसाल गढवाल'चा प्रचार सुरू केला. यासंबधी शौर्यने सांगितले की, हा प्रचार सर्वांगीण विकासावर आधारित आहे. ज्यात संस्कृतीबरोबरच शेती, शिक्षण, रोजगाराच्या नवीन संधी, आरोग्य, पर्यटन, खेळ आणि इतरही बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे.

ते पुढे म्हणाले की, ह्या मोहिमेचा उद्देश स्वयंसेवी समुह आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने परिसरातील क्षमतांचा विकास करणे आणि तो लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे.

तर आगामी लोकसभेची जागा भाजपाच्या तिकिटावर लढणार असल्याच्या चर्चेबद्दल विचारले असता शौर्य यांनी काहीही बोलण्यास करण्यास नकार दिला.

मागील वर्षापासून शौर्य यांच्या सक्रीय राजकारणात येण्याची चर्चा आहे. शौर्य भाजपाच्या बऱ्याच रॅली आणि कार्यक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेताना दिसत आले आहेत. २०१७ च्या सुरुवातीला सतपाल महाराजांच्या आणि प्रचारात मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंहांच्या नेतृत्वातील फाॅऊंडेशन कार्यक्रमात सहभागीही झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 19, 2018 10:03 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close