S M L

मोदींचा मेगा प्लान, पाण्यावर चालणाऱ्या विमानाने होणार समुद्र सफर

Updated On: Aug 12, 2018 01:48 PM IST

मोदींचा मेगा प्लान, पाण्यावर चालणाऱ्या विमानाने होणार समुद्र सफर

मुंबई, 12 ऑगस्ट : तुम्ही आत्तापर्यंत समुद्राची सफर बोटीतून किंवा जहाजातून केली असेल. मात्र लवकरच सी प्लेनमधून तुम्ही सागरी सफर करु शकता. सीप्लेन सेवेचा आवाका वाढवण्यासाठी केंद्रानं मेगा प्लॅन तयार केलाय. देशाच्या विविध भागात सीप्लेनचे तळ बनवण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. नागरी उड्डाण मंत्रालयानं याबाबतची घोषणा केली आहे.

महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी म्हणजे पहिल्या टप्प्यात ओडिशा, गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि आसाम या 5 राज्यांचा समावेश आहे. दरम्यान सध्या साबरमती, सरदार सरोवर आणि ओडिशाच्या चिल्का सरोवराजवळ सीप्लेनचं तळ तयार करण्यात येणार आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पंतप्रधान मोदींनी गुजरातमधून सीप्लेननं सफर केली होती. त्यानंतर सी प्लेनच्या योजनेला आणखी बळ मिळालं आहे.

पाण्यावर चालणारं विमान !! ही आहेत वैशिष्ट्ये

- स्पाईसजेट, पवनहंस सारख्या कंपन्या सीप्लेन खरेदीसाठी उत्सुक

- स्पाईसजेट 10 ते 14 सीटर सी प्लेनची निर्मिती करणार

Loading...
Loading...

- महिंद्रा एयरोस्पेस आणि वीकिंग एअर लिमिटेडही उत्सुक

- महिंद्राकडून 19 प्रवासी क्षमता असलेल्या एरोप्लेनची निर्मिती

- पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, आंध्रप्रदेश, आसामचा समावेश

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 12, 2018 01:48 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close