नवी दिल्ली, 30 जून : येत्या 5 जुलैपासून सुरू होणाऱ्या CA म्हणजेच चार्टर्ड अकाउंटंटच्या (CA Exams 2021) परीक्षांबाबत विद्यार्थ्यांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण झाले होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता CA च्या काही विद्दयार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (PM Narendra Modi) परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. तसंच परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोना झाला तर काय? असा प्रश्नही विद्यार्थ्यांना पडला होता. यावर ऑप्ट-आउट हा पर्याय सुचवण्यात आला होता. यावर आज सुप्रीम कोर्टात (Supreme court of India) सुनावणी पार पडली.
सुप्रीम कोर्टानं ऑप्ट-आउटचा (Opt-Out) पर्याय मंजूर करत इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सट्स ऑफ इंडियाला (Institute of Chartered Accountants of India) याबाबत एक एक व्यापक योजना तयार करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे आता दिल्ली हायकोर्टच्या (Delhi High Court) म्हणण्यानुसार, इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सट्स ऑफ इंडियानं तयार केलेली योजना पुरेशी नाही. ज्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबापैकी कोणाला कोरोनाची (Corona) लागण झाली असेल अशा विद्यार्थ्यांसाठी ऑप्ट-आउट हा मार्ग असू शकतो. म्हणजेच ते स्वतःहून परीक्षा न देता माघार घेऊ शकतात.
हे वाचा -प्राध्यापकांनो, गुड न्यूज! 3 हजार जागांच्या भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
विद्यार्थी स्वतःहून घेऊ शकतात माघार
ज्या उमेदवाराला स्वतः कोरोना किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने संसर्ग झाला असेल त्याला या परीक्षेचा अभ्यास करता येणार नाही. म्हणूनच तो परीक्षेतून माघार घेण्याचा पर्याय निवडू शकतो. या कारणास्तव परीक्षेतून उमेदवाराची माघार त्यांच्या अटेम्प्टसमध्ये (Attempts) मोजली जाणार नाही असं खंडपीठानं म्हटलं आहे. असे उमेदवार जुन्या आणि नवीन अभ्यासक्रमासोबतच पुढील परीक्षा देऊ शकतील. यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही.
तर RTPCR रिपोर्ट देण्याची गरज नाही
विद्यार्थ्यांना ऑप्ट-आउट हा पर्याय निवडून परीक्षेतून माघार घ्यायची असेल तर त्यांना RTPCR च्या चाचणीचा रिपोर्ट दाखवावा लागेल. मात्र जर विद्यार्थ्याकडे किंवा त्यांच्या कुटुंबातील संद्स्यांकडे मान्यताप्राप्त वैद्यकीय रिपोर्ट असेल तर त्याला RTPCR चा रिपोर्ट देण्याची गरज पडणार नाही. .
असा असेल नवीन टाईमटेबल
CA अंतिम परीक्षा 2021 5 जुलैपासून सुरु होईल आणि 19 जुलैपर्यंत असेल. CA इंटर परीक्षा 2021 6 जुलै ते 20 जुलै होणार आहे. तसंच CA फाउंडेशन परीक्षा जी 24 जूनपासून सुरु करण्यात येणार होती ती आता 24 जुलैपासून सुरु करण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career