नोटबंदीची वर्षपूर्ती, दिवसभरात कुठे काय झालं ?

नोटबंदीच्या वर्षपूर्तीचं निमित्त साधून आज विरोधकांनी देशभरात ठिकठिकाणी प्रतिकात्मक श्राद्ध घातलं. तर सरकारच्या वतीने या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी मंत्र्यांची अख्खी फलटनच मैदानात उतरवली गेली होती. अगदी नितीन गडकरींपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनीच वेळात वेळ काढून पत्रकार परिषदा काढून नोटबंदीचं जोरदार समर्थन केलं.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Nov 8, 2017 05:48 PM IST

नोटबंदीची वर्षपूर्ती, दिवसभरात कुठे काय झालं ?

08 नोव्हेंबर : नोटबंदीच्या वर्षपूर्तीचं निमित्त साधून आज विरोधकांनी देशभरात ठिकठिकाणी प्रतिकात्मक श्राद्ध घातलं. तर सरकारच्या वतीने या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी मंत्र्यांची अख्खी फलटनच मैदानात उतरवली गेली होती. अगदी नितीन गडकरींपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनीच वेळात वेळ काढून पत्रकार परिषदा काढून नोटबंदीचं जोरदार समर्थन केलं. एवढंच नाहीतर भाजपच्यावतीनं आजचा दिवस काळापैसा विरोधी दिवस म्हणूनही साजरा केला गेला. याउलट काँग्रेसने हाच दिवस भारतीय अर्थव्यवस्थेसाठी काळा दिवस म्हणून पाळला.

शिवसेनेनं तर भाजपसोबत सत्तेत असूनही नोटबंदीविरोधात राज्यभर निदर्शनं केली. रिपाईने मात्र, चक्क नोटबंदीचं समर्थन करत आजचा दिवस व्हाईट मनी डे म्हणून साजरा केला. राष्ट्रवादीही नोटबंदीविरोधात आज राज्यभरात रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळाली. पुण्यात अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी या मोर्चाचं नेतृत्व केलं तर मुंबईत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी नोटबंदी विरोधी मोर्चाचं नेतृत्वं केलं. नाशिकमध्येही शिवसेनेच्यावतीने गोदाकाठी नोटबंदीचं श्राद्ध घातलं.

पुण्यातही विविध सामाजिक संघटनांनी नोटबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त नानाविध आंदोलनं केली. कोणी कॅन्डल मार्च काढले तर कुणी निषेधसभा घेतल्या. एकूणच कायतर आजचा पूर्ण दिवस सत्ताधारी आणि विरोधकांनी नोटबंदी वर्षपूर्तीसाठीच खर्ची घातल्याचं बघायला मिळालं. सरकारच्यावतीने नोटबंदीमुळे काळापैसा बाहेर आल्याचा दावा केला गेला तर विरोधकांनी नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था कशी रसातळाला गेली हे पटवून देण्याचा जोरदार प्रयत्न केला. अर्थक्रांतीचे पुरस्कर्ते अनिल बोकील यांनी मात्र, नोटबंदीला आत्ताच पास-नापास ठरवणं थोडसं घाईचं ठरेल, अशी सारवासारव केली. एकूणच आजचा नोटबंदीचा वर्षपूर्तीचा दिवस राजकीय कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी 'फूल्ल ऑफ हॅपनिंग' होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2017 05:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...