'त्या' ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड नाही !,भाजपला दिलासा

'त्या' ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड नाही !,भाजपला दिलासा

२०१४ मधील पुण्याच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील एका बुथवरील मतदानाच्या ‘ईव्हीएम’ मध्ये छेडछाड करण्यात आल्याचा दावा एका याचिकेद्वारे करण्यात आला होता.

  • Share this:

04 जुलै : २०१४ मधील पुण्याच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील एका बुथवरील मतदानाच्या ‘ईव्हीएम’ मध्ये छेडछाड करण्यात आल्याचा दावा एका याचिकेद्वारे करण्यात आला होता. त्यानुसार तेथील ईव्हीएम मशीन ही चाचणी करता हैद्राबाद फाॅरेन्सिक लॅब येथे पाठवण्यात आली होती. त्या चाचणीचा अहवाल आला असून त्या अहवालात मशीनमध्ये कोणतीही छेडछाड करण्यात आली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलाय. त्यामुळे भाजपला मोठा दिलासा मिळालाय.

या याचिकेवर सुनावणी दरम्यान ईव्हीएममध्ये छेडछाड झालीये का? याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे निर्देश दिले होते. १८५ क्रमांकाच्या बुथवरील ‘ईव्हीएम’मध्ये फेरफार झाला का? याची चौकशी करून अहवाल देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने हैदराबात फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला (एफएसएल) दिले होते.

या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अभय छाजेड हे भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्याकडून पराभूत झाले होते. १५ ऑक्टोबर २०१४ रोजी मतदान झाले होते, तर १९ ऑक्टोबर २०१४ रोजी मतमोजणी झाली होती. छाजेड यांनी अॅड. प्रभाकर जाधव यांच्यामार्फत निवडणूक याचिका करून मिसाळ यांच्या निवडणुकीला आव्हान दिलं होतं. त्यात त्यांनी एक अर्ज केला होता. त्यावरील सुनावणी अंती न्या. मृदुला भाटकर यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना हे निर्देश दिले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2017 05:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading