कोरोना लस घ्या नाहीतर जेलमध्ये जा; सरकारचा अजब फतवा

कोरोना लस घ्या नाहीतर जेलमध्ये जा; सरकारचा अजब फतवा

लोकांना कोणत्याही वस्तूंची ऑफर देऊन नाही तर चक्क धमकी देऊन कोरोना लस घेण्यास प्रवृत्त केलं जात आहे.

  • Share this:

मनिला, 22 जून : जास्तीत जास्त लोकांनी कोरोना लस (Corona vaccine) घ्यावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. कुठे लशीच्या (Corona vaccination) बदल्यात पैसे, दारू, चिकन किंवा काही वस्तू जात आहेत. पण फिलिपाइन्समध्ये मात्र सरकारने अजब फतवा काढला आहे. लोकांना कोणत्याही वस्तूंची ऑफर देऊन नाही तर चक्क धमकी देऊन कोरोना लस घेण्यास प्रवृत्त केलं जात आहे.

फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष रोद्रिगो दुतेर्ते (Philippines President Rodrigo Duterte) यांनी कोरोना लसीकरणासाठी थेट धमकीच दिली आहे. कोरोना लस घ्या नाहीतर जेलमध्ये (Jail for refusing corona vaccine) जा. असा फतवा त्यांनी काढला आहे. शिवाय प्राण्यांचं औषध देण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

हे वाचा - कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतल्यावर बाहेर फिरा पण...; मोदी सरकारने दिला सल्ला

रॉयटर्सच्या वृत्तानुसार फिलिपाइन्समध्ये कोरोना प्रकरणं वाढत आहेत. अशाच कोरोना लसीकरण हळू होत आहे. फिलिपाइन्समध्ये 1.3 दशलक्ष कोरोना प्रकरणं आहेत. या वर्षात 70 दशलक्ष लोकांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट असताना 20 जूनपर्यंत फक्त 2.1 दशलक्ष लोकांनीच कोरोना लस घेतली आहे.

"तुम्ही इथं आहात, तुम्ही माणूस आहात आणि व्हायरस पसरवू शकता, त्यामुळे तुम्ही लस घ्यायला हवी.  जे लोक कोरोना लस घेण्यास नकार देत आहेत त्यांची यादी गावातील प्रमुखांकडून मागवून घेतली जाईल. जर तुम्ही लस घेतली नाही. तर मी तुम्हाला डुकरांना दिलं जाणारं आइव्हरमेक्टिन इंजेक्शन देईन", अशी धमकी त्यांनी दिली आहे.

हे वाचा - ...तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखता येईल; मोदी सरकारने सांगितला मार्ग

"मला चुकीचं समजू नका. देशात संकट आहे. फिलिपाइनिस सरकारचा विचार करत नाही आहेत, त्यामुळे मी निराश झालो आहे", असं स्पष्टीकरणही त्यांनी आपल्या या विधानावर दिलं आहे.

Published by: Priya Lad
First published: June 22, 2021, 10:56 PM IST

ताज्या बातम्या