निरुपमांच्या वक्तव्यामुळे नवा वाद, म्हणाले 'उत्तर भारतीय लोकच मुंबई चालवतात'

निरुपमांच्या वक्तव्यामुळे नवा वाद, म्हणाले 'उत्तर भारतीय लोकच मुंबई चालवतात'

काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी पुन्हा एकदा मराठी माणसाला डिवचणारं वक्तव्य केलं आहे. 'उत्तर भारतीय लोकच मुंबई चालवतात, त्यांनी ठरवलं तर मुंबई-महाराष्ट्र ठप्प होईल' असं वादग्रस्त वक्तव्य संजय निरूपम यांनी केलं आहे.

  • Share this:

नागपूर, 08 ऑक्टोबर : काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी पुन्हा एकदा मराठी माणसाला डिवचणारं वक्तव्य केलं आहे. 'उत्तर भारतीय लोकच मुंबई चालवतात, त्यांनी ठरवलं तर मुंबई-महाराष्ट्र ठप्प होईल' असं वादग्रस्त वक्तव्य संजय निरूपम यांनी केलं आहे.

नागपूर येथे उत्तर भारतीयांच्या वार्षिक सभेत बोलताना निरुपम यांनी हे विधान केलं. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतीय माणूसच मुंबई-महाराष्ट्र चालवतो. दूध विकण्यापासून टॅक्सी चालवण्यासारखी सर्व कामं उत्तर भारतीय माणूसच करतो. तुम्ही कोणतंही क्षेत्र सांगा. त्यामध्ये उत्तर भारतीय सक्रीय आहेत असं म्हणत निरुपमांनी उत्तर भारतीयांचे तर गोडवे गायलेच पण त्यांनी मराठी माणसाचा मात्र अपमान केला अशा प्रतिक्रिया आता उमटत आहे.

उत्तर भारतीय माणूस रिक्षा-टॅक्सी चालवतो. फळं-भाजी विकतो. बांधकाम क्षेत्रातील बहुतांश मजूर हे उत्तर भारतीय आहेत. सर्व क्षेत्रांमध्ये उत्तर भारतीयांचं प्रमाण लक्षणीय आहे. हीच माणसं संपूर्ण मुंबई चालवतात. त्यांना काम बंद करायला भाग पाडू नका असा इशाराही यावेळी संजय निरुपम  यांनी केला.

जर एक दिवस उत्तर भारतीयांनी ठरवलं, तर मुंबईकारांना जेवायला मिळणार नाही. त्यांनी ठरवलं तर मुंबई- महाराष्ट्र ठप्प होऊ शकतो, पण तसं करण्यास आम्हाला भाग पाडू नका असा अप्रत्यक्ष इशारादेखील निरुपम यांनी दिला.

उत्तर भारतीय लोक क्षेत्रीय मानसिकतेचे नाही तर राष्ट्रीय मानसिकतेचे असतात. गुजरातमध्येही उत्तर भारतीयांवर हल्ले होत आहे. आज पंतप्रधानांच्या गुजरातमध्ये उत्तर भारतीयांना मारले जात आहे. एक दिवस मोदींनाही वाराणसीला जायचे आहे, असंही निरुपम पुढे म्हणाले. त्यामुळे त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या वादाला जागा मिळणार इतकं नक्की.

VIDEO: चव्हाणांची जीभ घसरली, मोदी आणि फडणवीसांची लघवी करणाऱ्या व्यक्तीशी तुलना

 

First Published: Oct 8, 2018 08:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading