S M L

हवामान विभागाची गोड बातमी, यंदा पाऊस उत्तम!

यंदा पाऊस उत्तम होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं आज व्यक्त केलाय. सरासरीच्या 97 टक्के पाऊस होणार असून सलग पाऊस चांगला होण्याचं हे तिसरं वर्ष असणार आहे.

Ajay Kautikwar | Updated On: Apr 16, 2018 11:26 PM IST

हवामान विभागाची गोड बातमी, यंदा पाऊस उत्तम!

नवी दिल्ली,ता.16 एप्रिल: यंदा पाऊस उत्तम होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं आज व्यक्त केलाय. सरासरीच्या 97 टक्के पाऊस होणार असून  पाऊस चांगला होण्याचं हे सलग तिसरं वर्ष असल्याचं हवामान खात्याचे संचालक डी.एस.पै यांनी आज सांगितलं.

हवामान खात्याचा हा पहिला अंदाज आहे. दुसरा अंदाज मे महिन्यात आणि तिसरा आणि शेवटचा अंदाज जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देणात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र या अंदाजात फारसा बदल होणार नाही असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. हवामान खात्याच्या या अंदाजामुळं शेतकरी सुखावणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2018 04:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close