महागाईने सुरू होणार ऑक्टोबर महिना, एवढ्या रुपयांनी वाढल्या सिलेंडरच्या किंमती

14.2 किलो विना अनुदानित गॅस सिलिंडर मुंबईत 574 रुपये, कोलकातामध्ये 630 रुपये आणि चेन्नईमध्ये 620 रुपयात भरता येईल.

News18 Lokmat | Updated On: Oct 1, 2019 02:46 PM IST

महागाईने सुरू होणार ऑक्टोबर महिना, एवढ्या रुपयांनी वाढल्या सिलेंडरच्या किंमती

नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर : सरकारने 1 ऑक्टोबरपासून प्राकृतिक सिलेंडर (Natural Gas Price)च्या किंमती कमी केल्या आहेत. गेल्या अडीच वर्षात पहिल्यांदा सिलेंडरच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत. गेल्या महिन्यात 1 सप्टेंबरला विना सब्सिडीवाल्या सिलेंडर किंमतीत 15.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. यानंतर या महिन्यात एलपीजी  (LPG) पुन्हा महाग झालं आहे. एलपीजीच्या किंमतींमध्ये वाढ झाली असताना हा सलग दुसरा महिना आहे. मंगळवारी किंमती बदलल्यानंतर घरगुती एलपीजी सिलिंडर (14.2 किलो) च्या बाजारभावात सुमारे 15 रुपयांनी वाढ झाली आहे.

राजधानी दिल्लीत अनुदानित गॅस सिलिंडरची 14.2 किलो किंमत वाढवून 605 रुपये करण्यात आली आहे तर 19 किलो गॅस सिलिंडर आता 1085 रुपयात भरला जाईल. 14.2 किलो विना अनुदानित गॅस सिलिंडर मुंबईत 574 रुपये, कोलकातामध्ये  630 रुपये आणि चेन्नईमध्ये 620 रुपयात भरता येईल.

काँग्रेसला खिंडार, निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता बांधणार शिवबंधन!

तेल मंत्रालयाच्या पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अ‍ॅनालिसिस सेल (पीपीएसी) च्या म्हणण्यानुसार, ओएनजीसी आणि ऑईल इंडिया लिमिटेड (आयओसीएल) ने उत्पादित केलेल्या नैसर्गिक वायूची किंमत ब्रिटिश थर्मल युनिट्स प्रति 3.23  डॉलरवर आणली गेली आहे. नवीन नैसर्गिक वायूची किंमत 1 ऑक्टोबर 2019 पासून पुढील सहा महिन्यांसाठी प्रभावी होईल. तर राजधानी दिल्लीत प्रति सिलेंडर 590 रुपये (14.2 किलो) पर्यंत पोहोचला आहे.

Loading...

इतर बातम्या - भाजप पाठोपाठ शिवसेना ही मैदानात; 70 जणांची पहिली यादी जाहीर!

नैसर्गिक सिलेंडरची किंमत प्रत्येक सहा महिन्यानंतर ठरवली जाते. दरवर्षी 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबर रोजी गॅसच्या किंमती बदलल्या जातात. खत तयार करण्यासाठी आणि वीज निर्मितीसाठी नैसर्गिक वायूचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त, ऑटोमोबाईलमध्ये इंधन म्हणून सीएनजी आणि घरांमध्ये स्वयंपाकासाठी गॅस म्हणून बदलले जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: CNG price
First Published: Oct 1, 2019 02:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...