नोकियाचं कमबॅक, 3 अँड्राईड फोन लाँच

नोकियाचं कमबॅक, 3 अँड्राईड फोन लाँच

नोकिया भारतीय मार्केटमध्ये 3 नवे अँड्राईड मॉडेल घेऊन दाखल झालीये. हे तीन मॉडेल म्हणजे नोकिया 6,नोकिया5 आणि नोकिया 3.

  • Share this:

13 जून : एकेकाळी भारतीय मोबाईल मार्केटमधली दादा कंपनी असलेली नोकियाने जोरदार कमबॅक केलं. नोकियाने भारतीय मार्केटमध्ये 3 नवे अँड्राईड मॉडेल घेऊन दाखल झालीये. हे तीन मॉडेल म्हणजे नोकिया 6,नोकिया5 आणि नोकिया 3.

यातल्या  नोकिया 6 चे अॅमेझाॅनवर अॅडव्हान्स बुकिंग 14 जुलैला सुरू होतंय. याची किंमत 14999 असणार आहे. पण अॅमेझाॅन च्या प्राइम युजर्सला यावर 1000 रूपये सूट आहे. नोकिया 5 ची किंमत 12899 आहे आणि त्याच प्री बुकिंग 7जुलैला सुरू होणार आहे. आणि या रेन्ज मधल्या सगळ्यात स्वस्त  नोकिया -3,  9499 रुपयात मिळणार आहे.  हे तिन्ही मॉडेल  नोकियाने मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेसमध्ये रिलीज केले होते.

कसा आहे नोकिया 6

यातल्या सगळ्यात महागडा  नोकिया 6 ची स्क्रिन 5.5 इंच  आहे तर अडीच डी पूर्ण एचडी डिस्पले स्क्रिन आहे जिला कॉर्निंग गोरिला ग्लास प्रोटेक्शन आहे. या मोबाईलची रॅम 3 जीबी आहे तर 32जीबीचा इंटरनल स्टोरोज आणि बॅटरी 3000mAh इतकी आहे.सोबत 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 16 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे. तसंच अजुनही बरेच फिचर्स या मोबाईलमध्ये आहेत.

नोकिया 5

नोकिया 5 मध्ये फींगरप्रिंट स्कॅनर आणि  5.2 इंचांचा एचडी डिस्प्ले आहे. या मोबाईलमध्ये 2जीबी रॅम आहे तर 16जीबी  इंटरनल स्टोरेज आहे. तसंच या मोबाईलमध्ये 13 मेगापिक्सलचा रियर आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. तर 3000mAh ची बॅटरी आहे.

नोकिया 3

आणि सगळ्यात स्वस्त अशा नोकिया 3 मध्ये 5 इंच एचडी डिस्प्ले आहे. यात 16 जीबीचे इंटरनल स्टोरेज आणि 2जीबीची रॅम आहे.तर रियर आणि फ्रंट कॅमेरा दोन्ही 8 मेगापिक्सलचे आहेत.

First published: June 13, 2017, 8:08 PM IST

ताज्या बातम्या