आईने 8 महिन्याच्या मुलाची केली गळा आवळून हत्या, मृतदेह धान्याच्या टाकीत ठेवला!

आईने 8 महिन्याच्या मुलाची केली गळा आवळून हत्या, मृतदेह धान्याच्या टाकीत ठेवला!

नवरा-बायकोच्या वादामुळे आईने 11 ऑगस्ट रोजी मुलाची ओढणीने गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर आईने मुलाचा मृतदेह धान्य साठवलेल्या टाकीमध्ये लपवला.

  • Share this:

उत्तर प्रदेश, 22 ऑगस्ट : आई आणि मुलाच्या नात्याला कलंक लावणारी घटना घडली आहे. आईने पोटच्या 8 महिन्याच्या बाळाला मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशमधल्या गौतमबुद्ध नगरमध्ये हा गंभीर प्रकार घडला आहे.

11 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील नोएडा परिसरातील जेवर पोलिस स्टेशन परिसरातील गोपाळगड या गावात हरवलेल्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. यानंतर मुलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुलाचे आई, वडील आणि आजोबा यांना अटक केली आहे. गौतमबुद्ध नगर वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) वैभव कृष्णा यांनी सांगितलं की, पोलिसांना आठ महिन्यांच्या मुलाचा मृतदेह बुधवारी सापडला आणि या प्रकरणातील पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मुलाची हत्या करण्यात आल्याचं समोर यालं आहे.

आईला चौकशीसाठी अटक

खून प्रकरणात मुलाच्या आई, वडील आणि आजोबांना पोलिसांनी मृतदेह लपवल्याबद्दल अटक केली आहे. जेव्हा हत्येच्या संशयावरून पोलिसांनी मुलाची आई हेमा हिला ताब्यात घेतलं आणि तिची काटेकोरपणे विचारपूस केली तेव्हा आपणच हत्या केल्याचं आरोपी आईने कबुल केलं. मुलाबद्दल नवरा सतत वाद घालत असतो माझ्या चारित्र्यावर संशय घेत हा मुलगा माझा नाही असं बोलत असतो म्हणून मी मुलाची हत्या केल्याचं तिने म्हटलं.

इतर बातम्या - अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीने क्षणात संसार संपवला, पतीची चाकू भोसकून हत्या

पिंपरी चिंचवडमध्ये विवाहितेवर बलात्कार, मुलांना मारून टाकण्याची धमकी!

धान्य असलेल्या टाकीमध्ये आईने मुलाचा मृतदेह लपवला

वरिष्ठ पोलिस अधीक्षक वैभव कृष्णा यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरा-बायकोच्या वादामुळे आईने 11 ऑगस्ट रोजी मुलाची ओढणीने गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर आईने मुलाचा मृतदेह धान्य साठवलेल्या टाकीमध्ये लपवला. यानंतर आरोपी आईने मुलाला मारून टाकल्य़ाचं पतीला आणि सासऱ्याला सांगितलं त्यानंतर मुलाच्या मृतदेहाला बाहेर काढून जंगलात फेकून देण्यात आलं.

VIDEO : राज ठाकरे बाहेर आल्यानंतर शर्मिला यांची पहिली प्रतिक्रिया, उर्वशीही झाली भावूक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: murder
First Published: Aug 22, 2019 09:24 PM IST

ताज्या बातम्या