मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

धक्कादायक! जुगारात पत्नीची पैज लावत हारला पती, मित्रांना घरी बोलावलं आणि...!

धक्कादायक! जुगारात पत्नीची पैज लावत हारला पती, मित्रांना घरी बोलावलं आणि...!

सोमवारी पती त्याच्या 3 मित्रांसोबत घरात जुगार खेळत होता. बऱ्याच वेळा हारल्यामुळे त्याच्याकडचे पैसे संपले आणि त्याने पत्नीचीच पैज लावली आणि त्याही खेळात तो हारला.

सोमवारी पती त्याच्या 3 मित्रांसोबत घरात जुगार खेळत होता. बऱ्याच वेळा हारल्यामुळे त्याच्याकडचे पैसे संपले आणि त्याने पत्नीचीच पैज लावली आणि त्याही खेळात तो हारला.

सोमवारी पती त्याच्या 3 मित्रांसोबत घरात जुगार खेळत होता. बऱ्याच वेळा हारल्यामुळे त्याच्याकडचे पैसे संपले आणि त्याने पत्नीचीच पैज लावली आणि त्याही खेळात तो हारला.

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : महिलांवरील अत्याचाराचे अनेक गंभीर प्रकार समोर आले आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुगारामध्ये पैशांची पैज लावण्याऐवजी एका व्यक्तीने चक्क पत्नीची पैज लावली आणि हारला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैसे संपल्यामुळे जुगारात पतीने पत्नीची पैज लावली आणि यामध्ये तो हारला. त्यानंतर महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पीडित महिलेने यासंपूर्ण प्रकाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पती त्याच्या 3 मित्रांसोबत घरात जुगार खेळत होता. बऱ्याच वेळा हारल्यामुळे त्याच्याकडचे पैसे संपले आणि त्याने पत्नीचीच पैज लावली आणि त्याही खेळात तो हारला. त्यानंतर आरोपी पतीने त्याच्या मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. त्यासाठी पत्नीला अश्लील व्हिडिओही दाखवण्यात आला. त्यानंतर जबरदस्ती नराधमांनी तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती पीडितेकडून देण्यात आली आहे.

दिल्लीच्या नोएडामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित महिलेने तक्रार केल्यानंतर आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यासंबंधात पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तर संपूर्ण प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहे.

इतर बातम्या - स्वबळावर विधानसभा लढण्याच्या तयारीत, शिवसेनेच्या 'या' मंत्र्याने केलं जाहीर!

घरात घुसून केला बलात्कार...

गेल्या काही दिवसांआधी दिल्लीच्या याच परिसरातून बलात्काराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. 22 सप्टेंबरला नराधमांनी घरात घुसून बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिचा नवरा काही कामानिमित्त बाहेर गेला होता. त्यामुळे ती घरात एकटीच होती. याचवेळी एक अज्ञात व्यक्ती घरात घुसला आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला.

इतर बातम्या - कारची ट्रकला भीषण धडक, अपघात 4 जण जागीच ठार

मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा महिलेने विरोध केला. तेव्हा अज्ञात आरोपीने तिला मारहान केली आणि तिच्यावर बलात्कार केला. या कृत्यानंतर आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. तर या सगळ्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

VIDEO: मुसळधार पावसामुळे कऱ्हा नदीचं रौद्र रूप; जनावरांसह ग्रामस्थांचं स्थलांतर

First published: