S M L

उत्तर प्रदेश, बिहार आणि आसाममध्ये भूकंपाचे तीव्र धक्के

उत्तर प्रदेश, बिहार आणि आसामच्या काही भागांमध्ये बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास भूकंपाचे हादरे जाणवू लागले.

News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2018 01:08 PM IST

उत्तर प्रदेश, बिहार आणि आसाममध्ये भूकंपाचे तीव्र धक्के

12 सप्टेंबर : उत्तर प्रदेश, बिहार आणि आसामच्या काही भागांमध्ये बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास भूकंपाचे हादरे जाणवू लागले. आसाम आणि बिहारच्या उत्तरपूर्व जिल्ह्यांव्यतिरिक्त, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्वांचल आणि उत्तराखंडला लागून असलेल्या भागात या हादऱ्यांची तीव्रता जास्त होती. या भूकंपामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे.

भूकंप सर्वेक्षण संस्थानने भूकंपच्या झटक्यांची पडताळणी केल्यानंतर आसामच्या कोकराझारमध्ये भूकंपाचे मुख्य केंद्र असल्याची बाब समोर आली. विभागाने सांगितल्यानुसार, भूकंप 10 वाजून 22 मिनिटे 48 सेकंदात आला आणि त्याचे झटके 15 सेकंदांपर्यंत जाणवत होते. या भूकंपानंतर सगळ्यांनी घराबाहेर धाव घेतली. भागलपूर, गोपालगंज, किशनगंज, खगडिया, सहरसा आणि मधेपुरा येथेही भूकंपाचा जोरदार झटका बसलाय.

भूकंपाची तीव्रता अद्यापही स्पष्ट झालेली नाही, परंतु असं म्हटलं जातं की रिक्टर स्केल वर त्याची तीव्रता सुमारे पाच आहे. दरम्यान, सध्या कुठली जीवित वा आर्थिक हानी या भूकंपात झालेली नाही.याआधी आज सकाळी जम्मू-काश्मीर आणि हरियाणामध्ये तीव्र भूकंपाचे हादरे बसले. जम्मू आणि काश्मीरमध्ये सकाळी 5:15 वाजता रिक्टर स्केलच्या 4.6 इकक्या तीव्रतेचा भूकंप झाला.

 

घरबसल्या असा बदला आधार कार्डवरील फोन नंबर आणि पत्ता

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2018 01:08 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close