S M L

वाहतूक पोलिसांना यापुढे 'टोईंग' करण्यापूर्वी अनाउन्समेंट करावी लागणार

वाहतूक पोलिसांना यापुढे तुमची गाडी 'टो' करण्यापूर्वी टोईंग व्हॅनवरुन अनाऊन्समेंट करावी लागणार आहे. त्यादरम्यान, जर तुम्ही गाडीजवळ आलात तर गाडी 'टो' केली जाणार नाही, त्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल, मात्र टोईंग चार्जेस आकारले जाणार नाहीत.

Chandrakant Funde | Updated On: Nov 25, 2017 03:25 PM IST

वाहतूक पोलिसांना यापुढे 'टोईंग' करण्यापूर्वी अनाउन्समेंट करावी लागणार

25 नोव्हेंबर, मुंबई : वाहतूक पोलिसांना यापुढे तुमची गाडी 'टो' करण्यापूर्वी टोईंग व्हॅनवरुन अनाऊन्समेंट करावी लागणार आहे. त्यादरम्यान, जर तुम्ही गाडीजवळ आलात तर गाडी 'टो' केली जाणार नाही. अतिरीक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंबंधीचे निर्देश दिलेत. तसेच प्रत्येक टोईंग व्हॅन सोबत सहाय्यक पोलिस निरीक्षक किंवा त्यापेक्षा उच्च पदस्थ अधिकारी असणं बंधनकारक असणार आहे. गाडी टो करुन नेली जात असताना तुमच्या लक्षात आल्यास तुम्ही ती सोडवून घेवू शकता. त्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल, मात्र टोईंग चार्जेस आकारले जाणार नाहीत.

तसंच गाडीचा चालक गाडीजवळ असल्यास पोलिसांना तिथेच त्याची गाडी सोडावी लागेल, टोईंग व्हॅन सोबत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यासोबत ई-चलन मशीन बाळगावे लागणार आहे. गाडी टो करुन नेली जात असताना चालक आल्यास गाडी सोडण्यात यावी, असंही अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलंय. गाडी टो करत असताना चालक आल्यास दंड भरावा लागेल, मात्र त्याला यापुढे टोईंग चार्जेस भरावे लागणार नाही.

मुंबईत मध्यंतरी पोलिसांनी एक महिला तिच्या बाळाला दूध पाजत असतानाही तिची कार टोईंग केली होती. त्यावरून मुंबई पोलिसांवर चोहोबाजुनी टीका झाली होती. तसंच वाहनचालक समोर उपस्थित असतानाही पोलीस त्याचं वाहन उचलून नेत असल्याने अनेकदा पोलिस आणि वाहनचालकांमध्ये वाद उत्पन्न व्हायचे, टोईंग कंत्राटदाराचं भलं करण्यासाठीच पोलीस रस्त्यावरची वाहनं उचलून नेत असल्याचा आरोप होत होता. विदर्भ इन्फोटेक या टोईंग कंपनीला कंत्राट दिल्यावरूनही थेट मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी प्रवीण दराडे यांना लक्षं केलं होतं. त्यापार्श्वभूमीवरच मुंबईचे सहआयुक्त अमितेशकुमार यांनी वाहूतक पोलिसांना हे नवे आदेश दिलेत. त्यामुळे वाहन चालकांना निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 25, 2017 11:26 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close