कसं शक्य आहे? चीनमध्ये कोरोनामुळे हाहाकार, शेजारील देशात मात्र एकही रुग्ण नाही

कसं शक्य आहे? चीनमध्ये कोरोनामुळे हाहाकार, शेजारील देशात मात्र एकही रुग्ण नाही

चीनच्या शेजारच्या देशात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याचं समोर आलं आहे, यावर विश्‍वास ठेवणं जगाला कठीण जात आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 17 मार्च : चीन (China) आणि इटलीनंतर (Italy) दक्षिण कोरिया (south korea) कोरोना व्हायरसचे (Coronavirus) सर्वाधिक रुग्ण आहेत. मात्र याच्या शेजारच्या देशात एकही कोरोना बाधित रुग्णाची नोंद झालेली नाही.

उत्तर कोरिया (North Korea) असं या देशाचं नाव आहे. येथील सरकारने दावा आहे की, अद्याप कोरोना व्हायरसच्या (Covid - 19) संसर्गाचा एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. उत्तर कोरिया सरकारच्या नियंत्रणाखाली असलेली मीडिया म्हणते की, कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने अशी कठोर पावले उचलली आहेत की, प्रमुख नेता किम जोंग (kim jong un) हे मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसतात.

संबंधित - कोरोनापेक्षा TRP वर प्रेम, 'तारक मेहता'च्या निर्मात्याने केली अजब मागणी

किम जोंग-उन यांनी कोरोनाचा प्रसार होण्यासाठी जानेवारीमध्येच देशाची सीमा बंद केली होती, शिवाय व्यापार आणि पर्यटनावर आधीच नियंत्रण आणले होते. उत्तर कोरियाचे अधिकृत प्रेस नियमितपणे कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्व प्रकारच्या सावधगिरीविषयी लोकांना माहिती देत ​​असते. उदाहरणार्थ, मास्क घालणे, दरवाजाच्या हँडलचे निर्जंतुकीकरण करणे आदी. त्याचबरोबर सर्व सार्वजनिक वाहनांनाही व्हायरसमुक्त करण्यासाठी निर्जंतुकीकरणावर भर दिला जात आहे. सीमेवर तपासणी करण्याव्यतिरिक्त उत्तर कोरियाचे कस्टम अधिकारी परदेशातून आलेले कंटेनर 10 दिवसांसाठी वेगळ्या ठिकाणी ठेवत आहेत.

चीनच्या शेजारील देशात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याचं समोर आलं आहे, यावर विश्‍वास ठेवणं जगाला कठीण जात आहे. आर्थिक निर्बंध आणि कमकुवत वैद्यकीय व्यवस्थेमुळे उत्तर कोरियाची 40 टक्के जनता कुपोषित आहे आणि या रोगाला ते  सहजपणे बळी पडू शकतात. अशा परिस्थितीमुळे, उत्तर कोरियामध्ये कोरोना विषाणूच्या साथीमुळे गंभीर संकट उद्भवू शकते आणि बरेच लोकांचा जीव जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

संबंधित - अरे देवा आणखी एक कोरोना साँग! शाहरुखच्या 'सुनो ना...'चं नवं व्हर्जन, पाहा VIDEO

First published: March 17, 2020, 3:31 PM IST

ताज्या बातम्या