या शाखेच्या प्रवेशाला मराठ्यांना आरक्षण लागू नाहीच, नागपूर खंडपीठाचा निर्णय

या शाखेच्या प्रवेशाला मराठ्यांना आरक्षण लागू नाहीच, नागपूर खंडपीठाचा निर्णय

पदव्युत्तर वैद्यकीय जागांमध्ये मराठा आरक्षण मिळणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. सरकारने मराठा आरक्षण जाहीर केल्यावर वैद्यकीय पदव्युत्तर जागांमध्ये 16 टक्के आरक्षण मिळणार होते.

  • Share this:

नागपूर, 2 मे- पदव्युत्तर वैद्यकीय जागांमध्ये मराठा आरक्षण मिळणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. सरकारने मराठा आरक्षण जाहीर केल्यावर वैद्यकीय पदव्युत्तर जागांमध्ये 16 टक्के आरक्षण मिळणार होते. मात्र, प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाल्याने आणि जागा वाटप झाल्याने नागपुरातील काही पालकांनी आरक्षणाविरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.

सरकारने घाईघाईने आणि राजकीय हेतूने हे आरक्षण दिल्याचा आक्षेप या याचिकेत घेण्यात आला होता. त्यामुळे खंडपीठाने नियमाचा आधार घेत यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचा निर्णय आज दिला.

खंडपीठाच्या निर्णयावर काय म्हणाले चंद्रकांत पाटील..

न्यायालयाचा निर्णय हा यंदासाठी आहे. पुढील वर्षासाठी नाही. पुढील वर्षापासून आरक्षण लागू होणार आहे. आता दिलेल्या निर्णयाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. हा कायदा लागू होण्याच्या आधी जरी मेडिकल प्रवेश प्रकिया सुरू झाली असली तरी 16 टक्के आरक्षणच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतल्यानंतरच प्रवेश प्रक्रिया खऱ्या अर्थाने सुरू झाली होती. तेव्हा उद्याच आम्ही सर्वोच्च न्यायालयात नागपूर खंडपिठाच्या निर्णयाला स्थगिती देण्याबाबत याचिका दाखल करू, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

निर्णयावर स्थगिती मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार- विनोद पाटील

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वैद्यकीय विभागातील PG Admission Processमध्ये मराठा आरक्षण पुढील वर्षापासून लागू करण्याचा निर्णय दिला.

मराठा आरक्षणाचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात सुरू होते. माननीय न्यायालयाने अंतिम निकाल राखून ठेवलेला आहे. 24 जून ही निकालाची तारीख न्यायालयाच्या वतीने जाहीर करण्यात आली. त्यातच नागपूर खंडपीठाने दिलेला निकाल धक्कादायक आहे, असे मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले.

VIDEO : शिक्षक की हिटलर? विद्यार्थिनींना बेदम मारहाण

First published: May 2, 2019, 8:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading