जिल्हा प्रशासनाने भगवानगड दसरा मेळाव्याला परवानगी नाकारली

जिल्हा प्रशासनाने भगवानगड दसरा मेळाव्याला परवानगी नाकारली

भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारलीय. पंकजा मुंडे समर्थकांनी भगवानगडावर मेळावा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे रिसतर अर्ज केला होता. पण भडवानगडाचे मंहत आणि ट्रस्टी नामदेवशास्त्री यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला स्पष्ट नकार दिल्याने, आता जिल्हा प्रशासनानेही मेळाव्यास परवानगी नाकारलीय. पंकजा मुंडे समर्थकांना हा मोठा दणका मानला जातोय.

  • Share this:

अहमदनगर, 28 सप्टेंबर : भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारलीय. पंकजा मुंडे समर्थकांनी भगवानगडावर मेळावा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे रिसतर अर्ज केला होता. पण भडवानगडाचे मंहत आणि ट्रस्टी नामदेवशास्त्री यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करत पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला स्पष्ट नकार दिल्याने, आता जिल्हा प्रशासनानेही मेळाव्यास परवानगी नाकारलीय. पंकजा मुंडे समर्थकांना हा मोठा दणका मानला जातोय.

दरम्यान, कालच पंकजा मुंडे यांनी नामदेवशास्त्रींना भावनिक साद घालणारं पत्रं पाठवलं होतं. पण नामदेवशास्त्रींनी त्यालाही भीक घातली नाही, अशातच जिल्हा प्रशासनानेही गडावर मेळावा घेण्यास परवानगी नाकारल्याने पंकजा मुंडेंना गडाच्या पायथ्याशीच दसरा मेळावा घ्यावा लागणार आहे, सूत्रांच्या माहितीनूसार पंकजा मुंडे आता सावरगावात दसरामेळावा घेणार असल्याचं कळतंय.

काय आहे भगवानगड दसरा मेळाव्याचा वाद ?

वंजारी समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या भगवानगडावर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे दसरा मेळावा घेत होते. या मेळाव्याला पंचकृषीतील मुंडे समर्थक आवर्जून हजेरी लावत. पण गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात पंकजा मुंडे आणि भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांचात वर्चस्ववादातून मतभेद निर्माण झाले, त्यातूनच पंकजा मुंडेंनी परळीत गोपीनाथ गडाची स्थापना केली. त्यामुळे गेल्यावर्षीपासून नामदेवशास्त्रींनी भगवानगडावर यापुढे राजकीय भाषण नको, असा पवित्रा घेत पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास नकार दिला, गेल्यावर्षी याच मुद्यावरून पंकजा मुंडे आणि नामदेवशास्त्री यांच्यात मोठे मतभेद निर्माण झाले होते. तरीही नामदेवशास्त्री आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने गेल्यावर्षी पंकजा मुंडे प्रतिष्ठेचा मुद्दा करत गडाच्या पायथ्याशी मोठा मेळावा भरवत जोरदार शक्तीप्रदर्शनही केलं होतं. यावर्षीही तोच वाद उत्पन्न झाल्याने पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा गडाच्या पायथ्याशीच होणार असं दिसतंय. सूत्रांच्या माहितीनुसार धनंजय मुडे यांचाही नामदेव शास्त्रींना छुपा पाठिंबा असल्यानेच ते पंकजा मुंडेंना भगवानगडावर राजकीय मेळावा घेण्यास विरोध करताहेत.

संबंधीत  बातमी 

तुम्ही काही गोपीनाथ मुंडे नाहीत, नामदेव शास्त्रींकडून पंकजांच्या पत्राला केराची टोपली

First published: September 28, 2017, 6:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading