• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबईतलं भीषण वास्तव, Heart Attack आल्यानंतरही टॅक्सी चालकांचा रुग्णालयात नेण्यास नकार
  • VIDEO: मुंबईतलं भीषण वास्तव, Heart Attack आल्यानंतरही टॅक्सी चालकांचा रुग्णालयात नेण्यास नकार

    News18 Lokmat | Published On: Dec 14, 2018 05:57 PM IST | Updated On: Dec 14, 2018 05:57 PM IST

    मुंबई सेंट्रल, 14 डिसेंबर : मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाबाहेर मुजोर टॅक्सी चालकांमुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. पीडित व्यक्तीला ह्रदयविकाराचा झटका आला होता. मात्र एकही मुजोर टॅक्सीचालक रुग्णाला घेऊन रुग्णालयात जाण्यास तयार होता नव्हता. इतकंच नाही तर रेल्वेची 108 ही हेल्पलाईनही चालू नसल्याचं पीडितांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. टॅक्सी चालकांच्या या मुजोरीमुळे रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे. व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे की, ह्रदयविकाराचा झटका आलेली व्यक्ती स्ट्रेचरवर झोपली आहे. यावेळी तिथे उपस्थित पोलीस आणि इतर लोक त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी टॅक्सीचालकांना आवाज देत आहेत. वारंवार आवाज देऊनही एकही टॅक्सीचालक मदतीसाठी पुढे आला नाही. धक्कादायक म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांनादेखील मुजोर चालक जुमानत नव्हते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी