मोदींच्या गुजरातमधून कुणी शहीद झालं का ?,अखिलेश यादवांचं वक्तव्य

मोदींच्या गुजरातमधून कुणी शहीद झालं का ?,अखिलेश यादवांचं वक्तव्य

"बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशचे अनेक जवान शहीद झाले. पण गुजरातमधून कुणी शहीद झालं असं तुम्ही कधी ऐकलंय का ?"

  • Share this:

10 मे : बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशचे अनेक जवान शहीद झाले. पण गुजरातमधून कुणी शहीद झालं असं तुम्ही कधी ऐकलंय का ?, असं अतिशय असंवेदनशील आणि बेजबाबदार विधान उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केलंय.

अखिलेश यादव यांनी झाशीमध्ये मीडियाशी बोलतांना मोदी सरकारवर सडकून टीका केलीये. नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करताना अखिलेश यांचा तोल ढळलला.

बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशचे अनेक जवान शहीद झाले आहे. पण गुजरातमध्ये कधी कुणी शहीद झालंय का ? मोदी शहिदांचं राजकारण करतात,देशभक्तीची राजकारण, वंदे मातरमवर राजकारण करतात असा आरोपही अखिलेश यांनी केला.

तसंच मोदी आम्हाला हिंदूही मानत नाही अशी टीकाही यादव यांनी केली.

First published: May 10, 2017, 6:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading