कार मालकांची 'एलपीजी' सबसिडी होऊ शकते बंद !

कार मालकांची 'एलपीजी' सबसिडी होऊ शकते बंद !

घरगुती गॅस सिलेंडर्सच्या सबसिडीबाबत केंद्र सरकार आणखी एक कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ज्यांच्याकडे स्वतःची कार आहे, अशा एलपीजी ग्राहकांची सबसिडी सरकार कायमची बंद करू शकतं. सरकारने यासाठी प्रायोगिक तत्वावर निवडक आरटीओ कार्यालयांमधून कार मालकांचा डेटा गोळा करण्यासही सुरूवात केलीय

  • Share this:

06 डिसेंबर, नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलेंडर्सच्या सबसिडीबाबत केंद्र सरकार आणखी एक कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ज्यांच्याकडे स्वतःची कार आहे, अशा एलपीजी ग्राहकांची सबसिडी सरकार कायमची बंद करू शकतं. सरकारने यासाठी प्रायोगिक तत्वावर निवडक आरटीओ कार्यालयांमधून कार मालकांचा डेटा गोळा करण्यासही सुरूवात केलीय. एका बिझनेस इंग्रजी वृत्तपत्राच्या हवाल्यानुसार हे वृत्त देण्यात आलंय.

देशात आजही असे गॅस ग्राहक आहेत की ज्यांच्याकडे किमान दोन-तीन कार वाहनं आहेत तरीही ते बिनदिक्तपणे एलपीजीची सबसिडी लाटताहेत, अशाच ग्राहकांची माहिती गोळा करण्यास सरकारने सुरूवात केलीय. घरगुती गॅसची सबसिडी आधारक्रमांकाशी जोडली गेल्यानं सरकारी तिजोरीवरचा जवळपास 30 हजार कोटींचा बोजा कमी झाला आहे. आता श्रीमंतांना मिळणाऱ्या सरकारी अनुदानालाही कात्री लावण्याचं सरकार गांभिर्याने विचार करतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2017 06:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...