कितीही खर्च होऊ द्या पण दिवाळीत भारनियमन करणार नाही - चंद्रशेखर बावनकुळे

कितीही खर्च होऊ द्या पण दिवाळीत भारनियमन करणार नाही - चंद्रशेखर बावनकुळे

सध्या तापमानात वाढ झाल्याने विजेची मागणी देखील वाढत आहे आणि म्हणूनच 'गरज पडली तर ग्रिडमधून वीज विकत घेऊ' पण 'दिवाळीत भारनियमन लागू करणार नाही' असं आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 17 ऑक्टोबर : सध्या तापमानात वाढ झाल्याने विजेची मागणी देखील  वाढत आहे आणि म्हणूनच 'गरज पडली तर ग्रिडमधून वीज विकत घेऊ' पण 'दिवाळीत भारनियमन लागू करणार नाही' असं आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. न्यूज18 लोकमतवर यांची मुलाखत पार पडली, त्यात ते बोलत होते.

तापमान वाढल्यामुळे मुंबईत विजेची मागणी वाढली आहे. कारण 26 ते 27 अंशांवरून तापामान जेव्हा 32 ते 35वर जातं, तेव्हा विजेची मागणी दुप्पट होते आणि याच गरमीवर उपाय म्हणून एसीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. याचं मुख्य कारण म्हणजे एसी हजार ते बाराशे मेगावॅट वीज फक्त एसीलाच लागते. त्यामुळे त्यासाठी विजपुरवठाही तेवढाच करावा लागतो.

पण या सगळ्यामुळे कितीही खर्च करू मात्र सामान्यांची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही. दिवाळीत भारनियमन लागू केला जाणार नसल्याची घोषणा बावनकुळे यांनी दिली आहे.

पण जास्तीची विज लागली तर ती ग्रिडमधून देऊ पण दिवाळीत भार नियमन करणार नसल्याचं बावनकुळे म्हणाले आहेत. तर एकीकडे पावसाळा संपल्यामुळे मुंबईत बांधकामांना वेग आला आहे. ज्यामुळे हवेचा दर्जा खालावला आहे.

जागतिक आरोग्य संस्थेच्या एका सर्वेक्षणात सर्वात प्रदूषित महानगरांमध्ये जगात मुंबईचा नंबर चौथा आहे. आणि 400 शहरांच्या यादीत मुंबई 63व्या क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर येत्या 24 तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यानं मुंबईत पाऊस पडेल, असं भाकित वर्तवलं आहे. त्यामुळे मुंबईत जर आता पाऊस कोसळला तर गरमी आणखी वाढेल एवढं नक्की.

VIDEO: धावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर हे स्टंट कराणारा माकड शोधाच तुम्ही

First published: October 17, 2018, 7:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading