काँग्रेसच्या इफ्तारचं प्रणवदांना निमंत्रण नाही!

काँग्रेसच्या इफ्तारचं प्रणवदांना निमंत्रण नाही!

काँग्रेस पक्षातर्फे 13 जून रोजी नवी दिल्लीत इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. काँग्रेसने या इफ्तार पार्टीचं निमंत्रण सर्व विरोधी पक्षांना दिलं असून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना मात्र काँग्रेसनं निमंत्रण दिलेलं नाही.

  • Share this:

नवी दिल्ली,ता.11 जून : काँग्रेस पक्षातर्फे 13 जून रोजी नवी दिल्लीत इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. काँग्रेसने या इफ्तार पार्टीचं निमंत्रण सर्व विरोधी पक्षांना दिलं असून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना मात्र काँग्रेसनं निमंत्रण दिलेलं नाही.

काँग्रेस दरवर्षी इफ्तार पार्टीचं आयोजन करतं मात्र गेली दोन वर्ष काँग्रेसकडून इफ्तार पार्टी दिली गेली नव्हती. राहुल गांधी अध्यक्ष झाल्यानंतरची ही पहिलीच पार्टी आहे. दिल्लीतल्या हॉटेल ताज पॅलेस मध्ये इफ्तार पार्टी होणार आहे.

प्रणव मुखर्जींनी नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपाला हजेरी लावल्याने काँग्रेस त्यांच्यावर नाराज आहे. राहुल गांधी दररोज त्वेषानं संघावर हल्ले चढवत असताना प्रणव मुखर्जींनी संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यामुळं काँग्रेसची गोची झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं प्रणव मुखर्जींना इफ्तार पार्टीचं निमंत्रण न देणं महत्वाचं मानलं जाते.

 

First published: June 11, 2018, 5:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading