पितृपक्षात राज्यात मंत्रिमंडळ विस्तार नाहीच !

पितृपक्षात राज्यात मंत्रिमंडळ विस्तार नाहीच !

केंद्राप्रमाणेच राज्यातही मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता सूत्रांनी साफ फेटाळून लावलीय. विश्वसनीय सुत्रांनीच आयबीएन-लोकमतला यासंबंधीची माहिती दिलीय. केंद्रातल्या विस्तारानंतर राज्यातही मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता व्यक्त केली जात होती.

  • Share this:

महेंद्र मोरे, विशेष प्रतिनिधी

मुंबई, 5 सप्टेंबर : केंद्राप्रमाणेच राज्यातही मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता सूत्रांनी साफ फेटाळून लावलीय. विश्वसनीय सुत्रांनीच आयबीएन-लोकमतला यासंबंधीची माहिती दिलीय. केंद्रातल्या विस्तारानंतर राज्यातही मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता व्यक्त केली जात होती.

2019च्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी केंद्रात मोदींनी गेल्या रविवारीच मोठा फेरबदल करत 9 मंत्र्यांना सामावून घेतलंय. तर काही मंत्र्यांची खातीही बदलली आहेत. याच धर्तीवर राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ विस्तार करून काहींना डच्चू तर काहिंना नव्याने संधी देतील, अशी अटकळ व्यक्त केली जात होती. एवढंच नाहीतर येत्या 7 दिवसात राज्यातही मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या वृत्तं काही चॅनल्सकडून (आयबीएन लोकमत नाही) प्रसिद्ध केलं गेलं. पण आयबीएन लोकमतच्या सूत्रांनी राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता तुर्तासतरी फेटाळून लावलीय.

मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता दुरापास्त झाल्याने भ्रष्टाचाराचे आरोप झालेले मंत्री प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई यांना तुर्तासतरी अभय मिळालंय. तर मंत्रिमंडळात पुनरागमनासाठी देव पाण्यात ठेऊन बसलेल्या एकनाथ खडसेंचा पुन्हा भ्रमनिरास झालाय. दरम्यान, केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला डावललं गेल्याने किमान राज्यात तरी थोडीफार संधी मिळेल, अशी आशा सेना नेतृत्वाला वाटत होती. पण किमान पितृपक्षात तरी कोणताही मुहूर्त नसल्याचं सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आल्याने पुढचे पंधरा दिवस तरी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, हे आता स्पष्ट झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2017 06:40 PM IST

ताज्या बातम्या