• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • 'वीकएन्ड'ला माळशेज घाटात पर्यटकांना बंदी !

'वीकएन्ड'ला माळशेज घाटात पर्यटकांना बंदी !

वीकएन्डमध्ये माळशेज घाट पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. दरड कोसळण्याच्या भीतीमुळे हा निर्णय घेण्यात आलाय.

  • Share this:
कर्जत, 15 जुलै:  वीकएन्डमध्ये माळशेज घाट पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. दरड कोसळण्याच्या भीतीमुळे हा निर्णय घेण्यात आलाय. येत्या चोवीस तासात माळशेज परिसरात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. या जोरदार पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे पर्यटकांना माळशेज घाटावर मान्सून टुरिझमसाठी तात्पुरती बंदी घालण्यात आलीय. विकेण्डनिमित्त माळशेज घाटात येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होणारेय. पण पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनच हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. मान्सून टुरिझमचा आनंद घेण्यासाठी शेकडो पर्यटक माळशेज घाटात वीकएन्डला येत असतात. माळशेजमध्ये पुढचे दोन दिवस पर्यटनास बंदी घातल्याने पर्यटकांनी तिकडे फिरकू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. दरम्यान, माळशेज घाटात बंदी घातल्याने पर्यटकांची गर्दी लोणावळ्याकडे वाढू शकते. तिथे भुसे डॅम ओव्हरफ्लो झाल्याने गेल्या आठवड्यापासून पर्यटकांची गर्दी वाढू लागलीय. किंबहुना आजपासून त्या भागात ट्रॅफिक जॅम होण्याची शक्यता नाकारता येत नाही
First published: