सोनिया गांधींच्या बैठकीनंतर शरद पवारांनी पुन्हा सस्पेन्स वाढवला, शिवसेनेवर म्हणाले...

सोनिया गांधींच्या बैठकीनंतर शरद पवारांनी पुन्हा सस्पेन्स वाढवला, शिवसेनेवर म्हणाले...

राजकीय सत्ता पेच सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात 50 मिनिटं बैठक पार पडली.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची बैठक पार पडल्यानंतर राज्यात सत्तेचा तिढा सुटणार असल्याची शक्यता होती. पण या बैठकीत सत्ता स्थापनेवर कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती शरद पवारांनी दिली आहे. सोनिया गांधी यांच्यासोबतच्या बैठकीत ए के अँटोनीही उपस्थित होते. त्यांच्यासोबत चर्चा झाली. पण अद्याप कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचं पवार म्हणाले आहेत. त्यामुळे सत्तेचा तिढा सुटला नाही तर आणखी लांबला असं म्हणायला हरकत नाही.

बैठकीत महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. या सगळ्या घटनांवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. दोन्ही पक्षांच्या मोठ्या नेत्यांची मत जाणून घेत चर्चा करणार आणि मग निर्णय घेणार. यामध्ये राजू, शेट्टी, समाजवादी पार्टीला विश्वासात घेऊन निर्णय घेणार असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोनिया गांधी यांच्या बैठकीमध्ये शिवसेनेसंबंधी कोणतीही चर्चा झाली नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. एकीकडे बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे पवारांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाली असल्याची माहिती देण्याता आली आहे. दरम्यान, पवारांनीच राऊतांना दिल्लीला बोलावलं असल्याचं सांगण्यात येत आहे. या सगळ्या राजकीय घडामोड़ींमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 18, 2019 06:37 PM IST

ताज्या बातम्या