Home /News /news /

देशभर NRCलागू होणार का? गृहराज्यमंत्र्यांनी संसदेत दिलं पहिल्यांदाच स्पष्टीकरण

देशभर NRCलागू होणार का? गृहराज्यमंत्र्यांनी संसदेत दिलं पहिल्यांदाच स्पष्टीकरण

New Delhi: Protestors participate in a demonstration against Citizenship (Amendment) Act and NRC at  Shaheen Bagh in New Delhi, Sunday, Jan. 12, 2020.  (PTI Photo/Vijay Verma)   (PTI1_12_2020_000198B) *** Local Caption ***

New Delhi: Protestors participate in a demonstration against Citizenship (Amendment) Act and NRC at Shaheen Bagh in New Delhi, Sunday, Jan. 12, 2020. (PTI Photo/Vijay Verma) (PTI1_12_2020_000198B) *** Local Caption ***

'देशभर सुरू असलेल्या आंदोलनांमागे षडयंत्र आहे. देशाच्या हिताला बाधा आणण्याचा कट आहे.'

    नवी दिल्ली 04 फेब्रुवारी : CAA आणि NRCवरून देशभर वादळ निर्माण झालंय. शाहीन बागसहीत आंदोलनाची धग कायम आहे. असं असतानाच केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी स्पष्टपणे याबद्दल पहिल्यांदाच खुलासा केलाय. संसदेचं सध्या अधिवेशन सुरू आहे. आज सकाळी प्रश्नोत्तराच्या तासात गृहराज्यमंत्र्यांनी एका लेखी उत्तरात हे स्पष्ट केलंय. देशभर निर्माण झालेलं वादळ शांत करण्यासाठी सरकारने हे स्पष्टीकरण दिल्याचं बोललं जातय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीत घेतलेल्या निवडणूक प्रचारसभेतही यावर आंदोलकांवर टीका केली होती. सरकारने अनेकदा भूमिका स्पष्ट केल्यानंतरही देशभर आंदोलनं का केली जात आहेत. यामागे देशहिताला बाधा आणण्याचं षडयंत्र आहे असा आरोपही त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर सरकारच्या या उत्तराला महत्त्व प्राप्त झालंय. गेल्या पंधरा डिसेंबरला राजधानी दिल्लीतील शाहीन बाग परिसरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू होऊन जवळपास 51 दिवसाचा कालावधी झाला आहे. आगामी अजून किती दिवस हे आंदोलन सुरू राहणार यासंदर्भात अजूनही स्पष्टता नाही. जोपर्यंत नागरिकत्व सुधारणा कायदा परत घेतल्या जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा चंग शाहीन बाग आंदोलनकर्त्यांनी बांधला आहे. या आंदोलनामध्ये महिला बालक आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. हिंगणघाट जळीत प्रकरण : जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांनी सांगितला हा उपाय महिला या समाजातील पहिल्या घटक आहे, हे समजुन या आंदोलनात जे धरणे प्रदर्शन सुरू आहे. त्या धरणे प्रदर्शनात सर्वात प्रथम महिला बसलेल्या आहेत. या महिलांमध्ये मुली तरुणी आणि वयोवृद्ध महिला सहभागी झालेल्या आहेत. यांच्यासाठी येथे हे मंडप टाकण्यात आलेला आहे. या मंडपाच्या आत थंडीची पर्वा न करता या महिला आंदोलन करत आहे. व्यंगचित्र का काढत नाहीत राज ठाकरे? पुण्याच्या कार्यक्रमात केला खुलासा राजधानी दिल्लीतील थंडी ही प्रचंड बोचरी असते या बोचरी थंडीची तमा या महिलांनी बाळगली नाही आणि जवळपास 24 तास त्या आंदोलनात सहभागी असतात, काही महिला आजारी आहेत तरीपण बाजूला सहभागी आहे. काही महिलांची बालके शाळेत जातात त्यांना शाळेत पाठवल्यानंतर या महिला प्रदर्शनात सहभागी होतात अशा तऱ्हेने हे प्रदर्शन सुरू आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरून संपूर्ण देशभरात रणकंदन माजले आहे. याची सुरुवात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठांमध्ये ज्या पद्धतीने पोलीस अत्याचार झाले त्याचा निषेध म्हणून शाहीन बाग मध्ये प्रथम आंदोलनाला सुरुवात झाली.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या