आधार लिंकसाठी आता कोणतीही डेडलाईन नाही ; केंद्र सरकारचा नवा खुलासा

आधार लिंकसाठी आता कोणतीही डेडलाईन नाही ; केंद्र सरकारचा नवा खुलासा

तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करण्यासाठी आता कोणतीही डेडलाइन असणार नाहीये. सर्वोच्च न्यायालयात उद्या आधार सक्तीच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. तत्पूर्वीच केंद्र सरकारनं ती डेडलाइन हटवली आहे.

  • Share this:

13 डिसेंबर, नवी दिल्ली : तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करण्यासाठी आता कोणतीही डेडलाइन असणार नाहीये. सर्वोच्च न्यायालयात उद्या आधार सक्तीच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. तत्पूर्वीच केंद्र सरकारनं ती डेडलाइन हटवली आहे. आधार सक्तीच्या याचिकेवर गेल्या वेळी झालेल्या सुनावणीत 31 डिसेंबर 2017ची डेडलाइन वाढवून 31 मार्च 2018 केल्याची माहिती केंद्र सरकारचे अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली होती. त्यासाठी नोटिफिकेशही जारी करण्यात आलं होतं. परंतु आता आधार सक्तीची डेडलाइनच हटवण्यात आली आहे.

आधार योजनेच्या वैधतेला आव्हान देणा-या याचिकांची तातडीने सुनावणी घेण्याची विनंती अ‍ॅड. पी. बी. सुरेश, विपीन नायर आणि श्याम दिवाण यांनी केली होती. त्या वेळी सरकारच्या वतीने वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण दिलं होतं. अ‍ॅड. दिवाण यांनी सांगितले होते की, न्यायालयाचा अंतिम आदेश येईपर्यंत सरकारकडून आधारवर कोणतीही सक्ती केली जाऊ नये. जे लोक आधार जोडू इच्छित नाहीत, त्यांच्याबाबत सरकारची भूमिका अजूनही अस्पष्टच आहे.

यावर वेणुगोपाल म्हणाले होते की, असे केल्यास कोणीही आधार सादर करणार नाही. आधारचा डाटा सुरक्षित आहे का, हा वादाचा एक मुद्दा आहे. त्यावर वेणुगोपाल यांनी सांगितले की, न्या. श्रीकृष्णा यांच्या नेतृत्वाखालील डाटा सुरक्षा समिती आधार सुरक्षेसाठी कायद्यात काय सुधारणा करव्यात यासंबंधीचा अहवाल फेब्रुवारी 2018मध्ये सादर करणार आहे. आधारला आव्हान देणा-या विविध याचिका 2014पासून सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत.

First published: December 13, 2017, 7:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading