LIVE NOW

No Confidence Motion : "हे संसद आहे, मुन्ना भाईची पप्पी-झप्पीची जागा नाही"

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा त्यांचं वर्चस्व सिद्ध करणार की सरकार विरूद्ध मोट बांधण्यात विरोधक यशस्वी होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.

Lokmat.news18.com | July 20, 2018, 11:11 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated July 20, 2018
auto-refresh

Highlights

नवी दिल्ली,20 जुलै : चंद्राबाबू नायडूंच्या तेलगू देसम पक्षानं प्रस्तावित केलेला अविश्वासाच्या ठरावावर आज लोकसभेत चर्चेला सुरूवात झाली आहे. त्यामुळे लोकसभेतली अविश्वास ठरावाची लढाई कोण जिंकणार? बहुमत सिद्ध करून मोदी पुन्हा त्यांचं वर्चस्व सिद्ध करणार की सरकार विरोधात मोट बांधण्यात विरोधक यशस्वी होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. संध्याकाळी पंतप्रधान मोदी उत्तर देतील अशी माहिती मिळतेय. दरम्यान 314 खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतोय. तर विरोधकांनी आतापर्यंत 230 खासदारांची मोट बांधल्याचं समजतंय. मात्र अविश्वासाच्या ठरावाची ही लढाई फक्त बहुमत चाचणीपुरती मर्यादीत नाही. तर मोदींना विरोध करणाऱ्या एनडीएतल्या घटक पक्षांची नेमकी काय भूमिका असणार आहे हे आज स्पष्ट होईल.              
Load More