1 फेब्रुवारी, नवी दिल्ली : आजच्या अर्थसंकल्पातून केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली हे आयकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा 3 लाखांपर्यंत वाढवतील अशी आशा होती. पण प्रत्यक्षात तसं काहीच झालेली नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पातून करदात्या नोकरदारांची पुन्हा घोर निराशा झालीय. जेटलींनी आयकराच्या टॅक्सस्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. उलटपक्षी शिक्षण आणि आरोग्य शेष अर्थात अधिभारात 1 टक्क्यांची वाढ केलीय. पूर्वी हा अधिभार 3 टक्के होता आता तो 4 टक्के असणार आहे. नाही म्हणायला वैद्यकीय खर्चाची करमुक्त मर्यादा वाढवल्याने प्राप्तिकरात स्टॅण्डर्ड डिडक्शननुसार ४० हजार रुपयांची सूट मिळणार आहे. एवढीच काय ती समाधानकारक बाब म्हणावी लागेल. पण त्याचवेळी म्युच्यूफल फंडांसारख्या गुंतवणूकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर 10 टक्के कर लादण्यात आलाय. मोबाईल, टीव्हीच्या किमती देखील वाढणार आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय नोकदारांच्या पदरी निराशाच पडलीय.
टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाही
अरुण जेटली यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. म्हणजेच गेल्या वर्षी जी कररचना होती तीच यंदाही कायम असेल.
0 ते अडीच लाख – शून्य
2.5 लाख ते पाच लाख – 10 टक्के (तीन हजारांची अतिरिक्त सूट )
5 लाख ते दहा लाख – 20 टक्के
दहा लाखांपेक्षा जास्त – 30 टक्के
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा