Elec-widget

... म्हणून दिल्लीत भाजप विजयोत्सव साजरा करणार नाही!

... म्हणून दिल्लीत भाजप विजयोत्सव साजरा करणार नाही!

माओवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भाजपकडून आदरांजली

  • Share this:

26 एप्रिल :  दिल्लीतील तिन्ही महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल बहुतांश जाहीर झाले असून भाजपने तिन्ही ठिकाणी बहुमताचा टप्पा पार केला आहे. साहजिकच दिल्लीत कमळ फुलल्यानं भाजपच्या नेत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मात्र पक्षनेतृत्वानं विजयोत्सव धुमधडाक्यात साजरा न करण्याचे आदेश दिले आहेत.

Loading...

छत्तीसगडच्या सुकमामध्ये सोमवारी रस्त्याच्या बांधकामाची पाहणी करायला गेलेल्या 150 जवानांच्या ताफ्यावर 300 माओवाद्यांनी एकदम हल्ला केला. अॅम्बूश लावून करण्यात आलेल्या या अंदाधूंद गोळीबारात 25 जवान शहीद झाले.

या शहीद झालेल्या जवानांप्रती शोक व्यक्त करत भाजपकडून दिल्ली महापालिकेत मिळालेला विजय साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तर दुसरीकडे दिल्लीतील भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी दिल्लीवासियांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला आहे. दिल्ली मनपा निवडणुकीचे निकाल म्हणजे दिल्ली सरकारच्या कामकाजावर आलेले सार्वमत असल्याचं सांगत त्यांनी केजरीवाल यांना टार्गेट केलं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2017 01:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...