S M L

मुंबईसह अनेक शहरांत अजूनही कॅशचा तुटवडा, एटीएमबाहेर मोठ्या रांगा

मुंबईतल्या अनेक उपनगरात कॅश नसल्यामुळे एटीएम सेंटर बंद पडले आहेत. तर अनेक ठिकाणी एटीएम सेंटरबाहेर लोकांच्या रांगा लागल्या आहेत.

Samruddha Bhambure | Updated On: Apr 11, 2017 09:47 AM IST

मुंबईसह अनेक शहरांत अजूनही कॅशचा तुटवडा, एटीएमबाहेर मोठ्या रांगा

11 एप्रिल : पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याने, तसंच पैसे काढण्यावर निर्बंध घातल्याने देशभरातील एटीएममध्ये खडखडाट निर्माण झाला होता. लोकांच्या बँक खात्यात पैसे असूनही त्यांना पैसे मिळू शकत नव्हते. काहीशी अशीच परिस्थिती सध्या एटीएमबाबत शहरात दिसून येत आहे. शहरातील बहुसंख्य खासगी आणिनॅशनल बँकांच्या एटीएममध्ये खडखडाट झाला असून, असंख्य ठिकाणी 'नो कॅशचे बोर्ड' लागले आहेत. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

मुंबईसह अनेक शहरांमध्ये बहुतेक एटीएममध्ये पैसे नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांची एका एटीएमपासून दुसऱ्या एटीएमकडे धावाधाव सुरू आहे. ज्या ठिकाणच्या एटीएममध्ये पैसे आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याचे दिसून येत आहे. शहरातील बहुसंख्य एटीएमवर ‘नो कॅश’चे बोर्ड लागलेले दिसत आहेत. ज्या काही मोजक्या ठिकाणी पैसे आहेत, त्या ठिकाणी केवळ 2 हजार रुपयांच्या नोटाच उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे.

बँकांकडून कोणता उपाय शोधला जातोय का, हे कळत नाहीय, कारण ग्राहकांना काहीही कळवण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जातोच, त्याचबरोबर मनस्तापही होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2017 09:47 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close