मुंबईतील पावसाचा चैत्यभूमीवरील पुस्तक विक्रीला फटका

मुंबईतील पावसाचा चैत्यभूमीवरील पुस्तक विक्रीला फटका

ओखी वादळामुळे मुंबईत आलेल्या पावसाचा फटका चैत्यभूमीवरील पुस्तक विक्रीलाही बसलाय. महापरिनिर्वाण दिन उद्यावर येऊन ठेपला तरी दादरच्या चैत्यभूमी परिसरात अजून एकही बूक स्टॉल लागू शकलेला नाही, पावसामुळे शिवाजी पार्क परिसरात सगळीकडे चिखलाचं साम्राज्य आहे. त्यामुळे पुस्तक विक्रेत्यांना अजूनही स्टॉल्स लावता आलेले नाहीत.

  • Share this:

5 डिसेंबर, मुंबई : ओखी वादळामुळे मुंबईत आलेल्या पावसाचा फटका चैत्यभूमीवरील पुस्तक विक्रीलाही बसलाय. महापरिनिर्वाण दिन उद्यावर येऊन ठेपला तरी दादरच्या चैत्यभूमी परिसरात अजून एकही बूक स्टॉल लागू शकलेला नाही, पावसामुळे शिवाजी पार्क परिसरात सगळीकडे चिखलाचं साम्राज्य आहे. त्यामुळे पुस्तक विक्रेत्यांना अजूनही स्टॉल्स लावता आलेले नाहीत.

न्यूज 18 लोकमतने चैत्यभूमीवर जमा झालेल्या भीम सैनिकांच्या गैरसोईचं वृत्त दाखवताच पालिकेनं त्यांच्या निवाऱ्याची सोय आजुबाजुच्या शाळांमध्ये केलीय. पण पुस्तक विक्री स्टॉल्स काय ? हा प्रश्न अजूनही कायम आहे. दरवर्षी या परिसरात किमान 100 बूक स्टॉल्स लागतात. त्याद्वारे आंबेडकरी चळवळीशी संबंधीत पुस्तकं आणि साहित्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. ही पुस्तकं विक्रीची आर्थिक उलाढाल किमान काही लाखांमध्ये असते. यातूनच भीमसैनिकांना नवनवीन पुस्तकं वाचायला मिळतात. आणि आंबेडकरी पुस्तक विक्रेत्यांचाही वर्षभराचा व्यवसाय होतो. पण यंदा मात्र, पावसामुळे सगळंच चित्रं बदलून गेलंय. त्यामुळे लाखो भीमसैनिकांना आंबेडकरी साहित्यापासून मुकावं लागणार आहे.

First published: December 5, 2017, 4:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading