युतीवर उद्धव ठाकरेंनंतर आदित्यचं सूचक विधान; म्हणाले 'प्राण जाये पर वचन ना जाये'

युतीवर उद्धव ठाकरेंनंतर आदित्यचं सूचक विधान; म्हणाले 'प्राण जाये पर वचन ना जाये'

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होणार की नाही हा प्रश्न अजून सुटलेला नाही आहे. त्यावर आम्ही युती तोडणार नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 15 सप्टेंबर : 'प्राण जाये पर वचन ना जाये' असं सांगत युती करताना शिवसेनेकडून कोणताही दगाफटका किंवा विश्वासघात होणार नाही' असं स्पष्ट वक्तव्य युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना केलं आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होणार की नाही हा प्रश्न अजून सुटलेला नाही आहे. त्यावर आम्ही युती तोडणार नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांआधी उद्धव ठाकरे यांनीही 'आता युती कायम राहणार' असं सूचक विधान केलं होतं. त्यावर आता आदित्य ठाकरेंनीसुद्धा शिक्कामोर्तब केला आहे.

जागावाटपासंदर्भात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री बोलत आहेत. इतर कोणालाच काय चाललं आहे याची माहिती नाही. उद्धव साहेब आणि मुख्यमंत्री यांच्यात जे काही ठरलं आहे आणि युती जाहीर करताना राजकीय जे काही ठरलेलं आहे हे पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करण्यात आलं. 'त्यावेळी जे काही ठरलं त्यामध्ये आमच्याकडून कधीही दगाफटका होणार नाही. विश्वासघात होणार नाही.' असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

युतीच्या वादावर 'तुझं-माझं जमेना', भाजपनंतर आता शिवसेनाही स्वबळावर लढण्याच्या तयारीत?

संपूर्ण राज्यभर सध्या विधानसभा निवडणुकांचं वार दिसू लागलं आहे. त्यात भाजप शिवसेनेची युती तुटणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होणार का? यावर अजूनही दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. जागावाटपावरून भाजप सेनेमध्ये वाद आहे. जागावाटपाचा फार्म्युला हा समसमान असणार की शिवसेनेला-भाजप 115 ते 120 मतदारसंघच देणार. यावर सध्या मोठा सस्पेंस आहे.

इतर बातम्या - राष्ट्रवादीच्या एका व्यक्तीने शिवेंद्रराजे आणि माझ्यात भांडणं लावली, उदयनराजेंचा गौप्यस्फोट

विधानसभेच्या या पार्श्वभूमिवर रविवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेना नेते, मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख आणि मुंबईतील विभाग प्रमुख उपस्थित रहाणार आहेत. याच बैठकीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढायचं का? की युतीत जागावाटपात तडजोड करून लढायचं. यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना भाजपसोबत जागावाटपात तडजोड करून युती करणारच असल्याची माहिती मिळते आहे. जर शिवसेनेच्या वाट्याला भाजप पेक्षा कमी जागा येत असतील तर त्या जागा निवडण्याचा अधिकार शिवसेनेलाच हवा. जेणेकरून अ आणि ब वर्गातील मतदारसंघ शिवसेना निवडेल. शिवसेना कमी जागा लढवून क आणि ड वर्गातील जागा लढवण्यास अजिबात इच्छूक नसल्याची माहितीही सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्व शिवसेनेचं समाधान कसं करणार आणि शिवसेना राजी होणार का? याकडेच आता सर्वाचं लक्ष लागलं आहे.

इतर बातम्या - उदयनराजेंनी का केला भाजपमध्ये प्रवेश? राजू शेट्टींनी सांगितलं खरं कारण...!

तर युतीवर भाजप आणि शिवसेना सकारात्मक आहे. लवकरत उद्धव ठाकरे पक्षाची भूमिका स्पष्ट करतील असं शिवसेना नेता निलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत. युतीवर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. पण त्यावर कोणी विश्वास ठेऊ नका. सगळ्यांनी सबुरी ठेवा असं म्हणत त्यांनी युती होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

VIDEO: काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये लाडूसाठी तू तू-मैं मैं; घातला तुफान राडा

Published by: Renuka Dhaybar
First published: September 15, 2019, 5:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading