मुंबई, 28 नोव्हेंबर : यंदाच्या वर्षातल्या म्हणजे 2021मधल्या आयपीओ (IPO) बाजारावर नजर टाकली, तर या वर्षी अनेक नवीन आयपीओ दाखल झाल्याचं दिसतं. यातील बहुतांश सर्व आयपीओनी गुंतवणूकदारांना दुप्पट किंवा तिप्पट परतावा दिला आहे. त्यामुळे बाजारात येणाऱ्या प्रत्येक आयपीओला उदंड प्रतिसाद मिळत आहे. काही आयपीओ शंभर पटीपेक्षा जास्त वेळा सबस्क्राइब (Subscribe) झाले आहेत. तरीही अनेकांची तक्रार असते, की आयपीओमध्ये अर्ज करूनही त्यांना शेअर्स मिळत नाहीत. असं का होतं, असा प्रश्न त्यांच्या मनात असतो. आयपीओचं वाटप (IPO allotment) कसं होतं, याची प्रक्रिया जाणून घेतली तर काही टिप्स वापरून आयपीओद्वारे शेअर्स मिळण्याची शक्यता वाढते.
'सेबी'च्या (Sebi) नियमांनुसार, कोणत्याही आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार (Retail Investor) जास्तीत जास्त 2 लाख रुपयांची बोली लावू शकतात. अर्थात त्यासाठी किमान बोली असणं आवश्यक आहे. याचा अर्थ असा आहे, की एखाद्या आयपीओमध्ये 15 शेअर्सचा एक लॉट असेल, तर तुम्हाला कमीत कमी 5 शेअर्ससाठी बोली लावणं आवश्यक आहे.
एडलवाइस आयपीओ फंड अहवालानुसार, 2018 नंतर आयपीओमध्ये 50 टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. ज्या आयपीओमध्ये 15 ते 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे, त्यांना सरासरी 13 पट अधिक सबस्क्रिप्शन मिळालं आहे.
Corona Rules:...नाहीतर भरावा लागेल 10 हजारपर्यंत दंड, राज्य सरकारची नियमावली
एडलवाइस आयपीओ फंड (Edelweiss IPO fund) हा पहिला थीमॅटिक फंड आहे, जो 2018 मध्ये दाखल करण्यात आला होता. या फंडाच्या माध्यमातून आयपीओ काढणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. हा फंड नुकतेच जारी केलेले आयपीओ किंवा आगामी आयपीओमध्ये गुंतवणूक करतो. अलीकडच्या काळात, या फंडाने अंबर एंटरप्रायझेस, सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्ज, ग्लँड फार्मा, झोमॅटो आणि एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स यांसारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.
तसंच गुंतवणूकदाराने एकाच नावाने अनेक वेळा अर्ज करू नये. एका पॅन क्रमांकासह (Pan card) एका आयपीओसाठी फक्त एकदाच अर्ज करता येतो. तुम्ही एकाच पॅनसह अनेक वेळा अर्ज केल्यास ते अवैध मानलं जाईल.
video: तेजस्वीच्या बोलण्यावर सलमान भडकला; क्षणात केली बोलती बंद!
एखादा आयपीओ चांगला असेल आणि तुम्हाला त्यात गुंतवणूक करायची असेल, तुम्हाला त्याचे शेअर्स मिळावेत, अशी इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या नावाने, तुमच्या पत्नीच्या नावाने, तुमच्या सज्ञान मुलाच्या नावाने आणि तुमच्या आई किंवा वडिलांच्या नावाने अर्ज करू शकता. यामध्ये प्रत्येक अर्जासाठी वेगळा पॅन क्रमांक असल्याने शेअर्स मिळण्याची शक्यता वाढते. वेगवेगळ्या व्यक्तीने अर्ज केलेला असल्यानं ते अवैध ठरत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.