ना महामार्ग ना सावित्री पूल, गडकरींचं आश्वासन हवेत विरलं!

ना महामार्ग ना सावित्री पूल, गडकरींचं आश्वासन हवेत विरलं!

घोषणेनुसार डिसेंबर 2018 पर्यंत महामार्गाचे काम पुर्ण होण्याऐवजी आता डिसेंबर 2019 वर्ष आलं आहे. त्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गही नाही, आणि सावित्रीचा दुसरा पुलही नाही

  • Share this:

शैलेश पालकर, प्रतिनिधी

रायगड, 17 डिसेंबर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड आणि पोलादपूरदरम्यानच्या राजेवाडी ते नांगलवाडी गावांमधील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पुल वाहून गेला होता. त्यानंतर केवळ 27 दिवसांतच केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडे दूर्घटना स्थळालगत तीन पदरी दोन पुल बांधण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला. यानंतर फक्त 165 दिवसांमध्ये हा पुल बांधून लोकार्पण करण्यात आलं. या लोकार्पण सोहळयामध्ये केंद्रीय भुपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबर 2018पर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण पुर्ण होईल अशी घोषणा केली होती.

मात्र, या घोषणेनुसार डिसेंबर 2018 पर्यंत महामार्गाचे काम पुर्ण होण्याऐवजी आता डिसेंबर 2019 वर्ष आलं आहे. त्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गही नाही, आणि सावित्रीचा दुसरा पुलही नाही, अशी परिस्थिती असताना 2019 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोकणातील मतदारांना आकर्षिक करण्याचा हा गडकरीकृत चुनावी जुमला होता काय, असा सवाल केला जात आहे.

2 ऑगस्ट 2016 च्या मध्यरात्री मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पुल वाहून गेल्याच्या दूर्घटनेनंतर शोधकार्यात 2 एसटी गाडया आणि 1 तवेरा गाडीसह 29 मृतदेह शोधण्यात यश आल्यानंतर उर्वरित बेपत्तांना मृत घोषित करून सरकारी आर्थिक मदत देण्याचे काम पूर्ण झालं. या अपघाताला कारणीभूत असलेल्या दूर्घटनाग्रस्त पुलाच्या बाजूला 2000 साली एक पुल बांधण्यात आला असल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग पुर्णपणे ठप्प झाला नाही.

इतर बातम्या - कारमध्ये सिगारेट पेटवून फवारला एअर फ्रेशनर, त्यानंतर जे झालं ते वाचून धक्का बसेल

सावित्री पुलाच्या दूर्घटन स्थळापासून काही अंतरावर दोनशे मीटर लांबीचे आणि तीन पदरी वाहतुकीसाठी असे दोन पुल बांधण्याचा प्रस्ताव, खर्चाचा अंदाज आणि संकल्पना चित्रासह तयार करण्यात आला. सुमारे 50 कोटी रूपये या खर्चाच्या कामाच्या प्रस्तावाला केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडे मंजूरीसाठी पाठवण्यात आले. सन 2000 साली बांधण्यात आलेल्या पुलापेक्षा हे दोन्ही पुल उंच बांधण्याचा हेतू यामध्ये विषद करण्यात आला.

मात्र, सावित्रीच्या पात्राचा पुराच्या पाण्याचा प्रवाह पाहता यापैकी एक पुल सन 2000 साली बांधण्यात आलेल्या पुलाच्या उजव्या बाजूला बांधण्याचे ठरलं. कोसळलेल्या ब्रिटीशकालीन पुलाच्या डाव्या बाजूला दुसरा पुल बांधण्यात आला. याच ब्रिटीशकालीन पुलाच्या डाव्या बाजूला बांधण्यात आलेल्या पुलाच्या लोकार्पण प्रसंगी नितीन गडकरी यांनी डिसेंबर 2018 पर्यंत महामार्गाचे काम पुर्ण होईल, अशी घोषणा केली होती. पण कामाची गती पाहता ती घोषणा 2019मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठीच होती हे सहज स्पष्ट झालं आहे.

इतर बातम्या - कारमध्ये विद्यार्थ्यांसोबत संभोग करायची महिला शिक्षिका, Snapchat वर पाठवायची...!

येत्या 2022पर्यंत हे मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास जाण्याची शक्यता दिसून येत आहे. मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या चौपदरीकरणामध्ये 143 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचे काँक्रीट रस्ते खुले करण्यात आले आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 366 किलोमीटरच्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रिटीकरण हाती घेतले आहे.

रायगड जिल्ह्यातील इंदापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या पीडब्ल्युडी विभागामार्फत दहा टप्प्यांमध्ये हे काँक्रिटीकरण हाती घेण्यात आले आहे. जून 2020 मध्ये पनवेल ते इंदापूर दरम्यान 84 किलोमीटर अंतराचा रस्ता पूर्ण होण्याची अपेक्षा असून इंदापूर ते झाराप दरम्यान मार्च 2020 पर्यंत मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णपणे गतिमान झालेले दिसून येईल.

दरम्यान, पोलादपूर ते महाड दरम्यानच्या सावित्री नदीवरील दुसऱ्या पुलाचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले असूनही ते 2020 उजाडल्यानंतरच पुर्ण होण्याची शक्यता दिसून येत आहे. तोपर्यंत उर्वरित काँक्रीटचे रस्ते, छोटे पुल, मोऱ्या तसेच अन्य सुविधांची पुर्तता करण्याकडे चौपदरीकरणाच्या कामाचा कल दिसून येणार आहे.

इतर बातम्या - अपहरण करून 8वीच्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार, नंतर 50 हजारांना विकलं

Published by: Renuka Dhaybar
First published: December 17, 2019, 1:52 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading