नवी दिल्ली, 10 जानेवारी: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री (Road transport and highway minister) नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी देशाच्या सिमेंट आणि स्टील उद्योगांवर (cement and steel industry) जोरदार टीका केली आहे. सिमेंट आणि स्टील उद्योगांमध्ये परस्पर हितसंबंध (kartel) असल्याचा आरोप (Allegation) त्यांनी केला आहे. त्यामुळे या दोन्ही उद्योगांचा परस्पर फायदा होत आहे. ते म्हणाले की मागणी नसतानाही अलिकडच्या काळात सिमेंट आणि स्टीलच्या किंमतीत लक्षणीय वाढ होत आहे. याचा थेट परिणाम रिअल इस्टेट (Real estate) क्षेत्रावर पडत आहे. गडकरी पुढे म्हणाले की, हा प्रकार यापुढेही कायम राहिला तर येत्या काही काळात पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर (Infrastructure projects) याचा दूरगामी परिणाम होऊ शकतो.
राष्ट्रीय हिताच्या दृष्टीकोनातून हे वागणं बरोबर नाही
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या बैठकीस हजेरी लावली होती. यावेळी ते वेस्टर्न रीजनच्या सदस्यांशी बोलताना म्हणाले की, “सिमेंट कारखाने सध्याच्या परिस्थितीचा फायदा उठवत आहेत. हे राष्ट्रीय हिताच्या दृष्टीकोनातून चुकीचं आहे. पुढील पाच वर्षांत सुमारे 111 लाख कोटी रुपयांचा पायाभूत सुविधा प्रकल्प उभारण्याच्या सरकारचा मानस आहे. त्यामुळे स्टील आणि सिमेंटचे दर जर असेच चढे राहिले, तर हे आमच्यासाठी फार कठीण असेल."
सिमेंट आणि स्टील उद्योगावर केली टीका
सिमेंट आणि स्टील उद्योगाबद्दल बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, या दोन उद्योगांमध्ये कार्टेल (परस्पर हितसंबंध) आहे. ते म्हणाले की, देशातील सर्व स्टील कंपन्यांकडे स्वतः च्या लोह खाणी आहेत. तसेच कामगार आणि वीज दरामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. असं असतानाही या कंपन्या खर्च वाढवूनही सिंमेट आणि स्टीलच्या किंमती वाढवत आहेत. यामागील मुख्य कारण समजणं खूप अवघड आहे, असेही गडकरी म्हणाले.
यावेळी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, वेस्टर्न रीजन यांनी सिमेंट आणि स्टील उद्योगांसाठी नियामक प्राधिकरण (रेग्युलेटरी अथॉरिटी) तयार करण्याची मागणी केली आहे. यावर ही सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थ मंत्रालयाकडे पाठवणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nitin gadkari